खुर्चीलाच स्ट्रेचर बनवून गरोदर महिलेला नेले रुग्णालयात, शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघातील प्रकार; जाणून घ्या कुठं घडली घटना?

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. मात्र, आजही हिमाचल प्रदेशची (Himachal Pradesh) राजधानी असलेल्या शिमल्यात (Villages in Shimla) अशी अनेक गावे आहेत, ज्यामध्ये जीवनावश्यक सोयीसुविधांचा अभाव जाणवत आहे.

  शिमला : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. मात्र, आजही हिमाचल प्रदेशची (Himachal Pradesh) राजधानी असलेल्या शिमल्यात (Villages in Shimla) अशी अनेक गावे आहेत, ज्यामध्ये जीवनावश्यक सोयीसुविधांचा अभाव जाणवत आहे. जुब्बल कोटखाई (Jubbal-Kotkhai) येथे एक मोठी घटना घडली. येथे एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी कोणतीही रुग्णवाहिका येऊ शकली नाही. त्यामुळे या गरोदर महिलेला स्ट्रेचर नसल्याने खुर्चीलाच स्ट्रेचर बनवून रुग्णालयात नेण्यात आले.

  हिमाचल प्रदेशचे शिक्षणमंत्री असलेल्या रोहित ठाकूर (Rohit Thakur) यांच्या जुब्बल कोटखाई विधानसभा मतदारसंघात हा प्रकार घडला. हे गाव जुब्बल-कोटखाई विधानसभा क्षेत्रातील कुड्डू पंचायत अंतर्गत येते आणि या गावात सुमारे 30 घरे आहेत. याबाबत एका व्यक्तीने सांगितले की, गावातून मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी सुमारे दीड तासाचा प्रवास करावा लागतो. सिमल्यासारख्या दुर्गम गावात रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत. पण इथे इंटरनेटची सुविधा उत्तम प्रकारे कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या गावातील तरुण आपल्या गावातील व्यथा थेट सरकारपर्यंत पोहोचवत आहेत.

  गावात चांगल्या रस्त्याचा अभाव

  नाडाळ गावापासून मुख्य रस्ता सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे. हिमाचल प्रदेशात निवडणुका झाल्याने अनेक पक्ष बदलले. मात्र, या गावासाठी रस्त्याची सुविधा कोणत्याही सरकारमध्ये उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे येथील स्थानिक लोक प्रत्येक विधानसभा निवडणुकीत ही मागणी राजकीय पक्षांसमोर करतात.

  रस्ता नाही पण इंटरनेट आहे

  या गावात जीवनावश्य सुविधांचा अभाव आहे. त्यात रस्ता देखील चांगला नाही. पण या ठिकाणी रस्ता जरी नसला तरी इंटरनेटची मोठी सुविधा आहे.