पंतप्रधानांना PMO ऑफिसकडून दैनंदिन गरजांसाठी मिळते ‘इतके’ बजेट मात्र मोदी खर्चासाठी…

पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदींना भेटण्यासाठी फक्त त्यांची आई हीराबेन आली आहे, ती सुद्धा एकदाच. खुद्द मोदींनी त्या काळातील व्हिडिओ ट्विट केला होता. यामध्ये ते आईला व्हीलचेअरवर पंतप्रधान निवासस्थानी घेऊन जाताना दिसले.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७१ वर्षांचे झाले. या निमित्ताने जाणून घेऊयात त्याच्या जीवनाशी संबंधित काही गोष्टी ज्या वाचकांना माहित नाहीत. यामध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांचा दैनंदिन खर्च, त्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांविषयी आणि मोदींच्या कुटुंबातील सदस्यांबाबत जे त्यांना भेटायला येतात त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.

  पीएमओकडून मिळते बजेट मात्र मोदी ते नाकारून त्यांच्या पगारातून वस्तू खरेदी करतात
  मोदींचा दैनंदिन खर्च किती आहे, त्यांचे बजेट कोठून येते? याचे उत्तर पंतप्रधान निवासस्थान आणि पंतप्रधान कार्यालय, म्हणजेच पीएमओ कडून मिळाले नाही, परंतु एका उच्चस्तरीय सदस्य असलेल्या स्रोतांकडून माहिती मिळाली आहे की, पंतप्रधान मोदी आपल्या वैयक्तिक गरजांसाठी कोणत्याही गोष्टीसाठी पीएमओ कडून निधी वापरत नाहीत.पीएमओच्या या फंडात, पंतप्रधानांच्या दैनंदिन गरजांसाठी प्रत्येक गोष्टीची व्यवस्था केली जाते. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी अशीच व्यवस्था असते परंतु पीएम मोदी हे सर्व खर्च त्यांच्या पगारातून करतात.

  आवश्यक गोष्टींच्या देखभालीसाठी महिन्यातून दोनदा वैयक्तिक कर्मचारी येतात
  मोदी स्वतः खर्च करतात, परंतु ही व्यवस्था कोण करते? मोदींचे विश्वासू वैयक्तिक कर्मचारी महिन्यातून दोनदा भेट देतात, असे सूत्राने सांगितले. मोदी या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारातून पैसेही देतात.मात्र, मोदींचे हे विश्वासू कर्मचारी कोण आहेत याबाबत उत्तर मिळाले नाही. मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून विश्वासार्ह कर्मचारी त्यांच्यासोबत आहेत एवढेच सांगण्यात आले. आताही हे कर्मचारी मोदींपासून फक्त एक फोन कॉल दूर आहे.

  पंतप्रधानांना भेटायला त्यांच्या कुटुंबातून केवळ आईच फक्त एकदा आली
  पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदींना भेटण्यासाठी फक्त त्यांची आई हीराबेन आली आहे, ती सुद्धा एकदाच. खुद्द मोदींनी त्या काळातील व्हिडिओ ट्विट केला होता. यामध्ये ते आईला व्हीलचेअरवर पंतप्रधान निवासस्थानी घेऊन जाताना दिसले.