इच्छा मरण देणारी मशीन ‘या’ प्रकारे करते काम; भारत या मशीनला मान्यता देऊ शकतो का?

डॉक्टर किंवा ती व्यक्ती ईच्छा मरणासाठी शिफारस करू शकते. हे मशीन वापरताना कोणतीही अडचण येणार नाही. व्यक्तीला यंत्रामध्ये बसवले जाते आणि ऑक्सिजनची पातळी गंभीर केली जाते आणि त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.

    काही देशामध्ये विशेष परिस्थितीमध्ये इच्छा मृत्यूला कायदेशीर परवानगी आहे. स्वित्झर्लंडच्या सरकारने ईच्छा मृत्यूच्या मशीनला कायदेशीर परवानगी दिली आहे. या मशीनच्या सहाय्याने बरेच दिवसापासून आजारी असलेल्या लोकांना अगदी शांतीने एक मिनिटात मृत्यू देऊ शकतो. या मशीनला सरको अस म्हणलं जातं.

    स्वित्झर्लंडमध्ये इच्छा मृत्यूला 1942 पासूनच कायदेशीर परवानगी आहे. एक्झिट इंटरनेशनल या एनजीओचे संचालक डॉक्टर फिलिप यांनी ही मशीन बनवली आहे, त्यांना डॉ. डेथ असही म्हणलं जातं. मागील वर्षी 1300 लोकांनी इच्छा मृत्यूसाठी एनजीओच्या सेवांची मदत घेतली होती. पुढच्या वर्षी पर्यंत ही मशीन इच्छा मृत्यू असणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध असेल.

    ही मशीन खुप आजारी असलेल्या लोकांसाठी बनवली गेली आहे. या मशीनमध्ये नायट्रोजनची पातळी वाढवून ऑक्सिजनची पातळी कमी केली जाते आणि कोणताही त्रास न होता एक मिनिटात मृत्यू येऊ शकतो. जर व्यक्तीची काहीही हालचाल होत नसेल तरीही आपल्या डोळ्याच्या पापण्या हलवून ही आपण या यंत्राला सुचना देऊ शकतो.

    काही लोकांनी हे मशीन बनवण्यास विरोध केला आहे आणि यावर वादविवाद ही होत आहेत. काही लोक असही म्हणत आहेत की, यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढेल. पण तरीही दीर्घकाळापासून आजारी असलेल्या आणि ज्यांच्यावर कितीही उपचार केले तरीही ते बरे होत नाहीत अशा व्यक्तींचा विचार करून या मशीनला परवानगी दिली आहे.

    डॉक्टर किंवा ती व्यक्ती ईच्छा मरणासाठी शिफारस करू शकते. हे मशीन वापरताना कोणतीही अडचण येणार नाही. व्यक्तीला यंत्रामध्ये बसवले जाते आणि ऑक्सिजनची पातळी गंभीर केली जाते आणि त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. अनेकांनी या मशीनला गॅस चेंबर असही म्हणलेलं आहे.

    भारतात ईच्छा मृत्यूला परवानगी नाही, भारतीय कलम 309 अंतर्गत याला आत्महत्येचा गुन्हा म्हणतात, पण भारतात कोर्टाने निष्क्रिय मृत्यूला परवानगी दिली आहे. निष्क्रिय इच्छा मृत्यू म्हणजे एखादी व्यक्ती खूपच आजारी असेल आणि कितीही उपचार केले तरी तो बरा होत नाही आणि त्याच्या वेदना असह्य असतात, अशावेळी त्या व्यक्तीचे उपचार बंद केले जातात.