मोदी सरकारचं काम तरुणांना बळ देणं, या सूत्रांवर देशाचा विकास करणार

१० वर्षांपासून आमचे प्रयत्न २०४७ पर्यत भारताला विकसित बनवण्य़ाचा प्रयत्न सुरु आहेत. देशातील २५ कोटी जनतेला आम्ही गरिबीच्या खाईतून बाहेर काढण्यास आम्ही यशस्वी ठरलो आहोत.

  मागील १० वर्षांमध्ये जे काही काम आम्ही केले आहे त्या भरवशावर देशामधील जनता आम्हाला पुन्हा संधी देईल. देशामधील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरांमध्ये सुविधा कशी दिली जाईल यासंदर्भात आम्ही नेहमीच प्रयत्न केले आहेत. देशामधील ८० कोटी जनतेला आम्ही मोफत रेशन देत आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांच्या संधी निर्माण केल्या. मागील १० वर्षांपासून आमचे प्रयत्न २०४७ पर्यत भारताला विकसित बनवण्य़ाचा प्रयत्न सुरु आहेत. देशातील २५ कोटी जनतेला आम्ही गरिबीच्या खाईतून बाहेर काढण्यास आम्ही यशस्वी ठरलो आहोत.

  भ्रष्टाचाराचा अंत
  भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी नमूद केले की, प्रत्येक घरात पाणी, सर्वांना वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडण्याचे काम केले आहे. जनतेच्या अन्नविषयक समस्या दूर केल्या आहेत. ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे. मूलभूत गरजा पूर्ण झाल्या, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होईल. आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करत आहोत. आम्ही भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवली आहे.

  शेतकरी, महिला आणि तरुणांवर भर
  अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचायचे आहे. आदिवासी जमातींसाठी खास योजना आणली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सरकार गरिबी हटवण्याचे काम करत आहे. सरकारने आव्हानांचा धैर्याने सामना केला आहे. ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत.

  रोजगाराच्या संधीत वाढ
  अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, देशातील तरुण पिढी ही देशाचे भवितव्य आहे त्यामुळे देशातील जनता भविष्याकडे पाहत आहे. ते आशावादी आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जात आहोत. 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी कामाला सुरुवात केली तेव्हा अनेक आव्हाने होती. जनहितार्थ काम सुरू केले आहे. जनतेला जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. देशात एक नवा उद्देश आणि आशा निर्माण झाली आहे. जनतेने आम्हाला दुसऱ्यांदा सरकारमध्ये निवडून दिले. आम्ही सर्वसमावेशक विकासाबद्दल बोललो. सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न या मंत्राने पुढे जातोय.