मंत्र्यांसाठी महागाई कधीच नसते; एआययूडीएफची केंद्रावर टीका

‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट’चे अध्यक्ष मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. भारताचा पैसा अर्थमंत्र्यांकडे आहे. एखादी व्यक्ती खरेदी करण्यासाठी नेमका किती पैसा खर्च करते हे त्यांना कसे कळणार? मंत्र्यांसाठी महागाई कधीच नसते, असे ते म्हणाले. भाजपा खासदारांनी त्यांच्या पत्नींना विचारावे की, त्या किचन कसे चालवतात? असा सवालही त्यांनी केला.

    नवी दिल्ली : महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले (Budget Collapsed)  आहे. वाढत्या महागाईविरोधात काल काँग्रेसने देशभरात आंदोलन होत केले. त्यातच ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट’चे (AIUDF) अध्यक्ष मौलाना बदरुद्दीन अजमल (Maulana Badraddin Ajmal) यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. भारताचा पैसा अर्थमंत्र्यांकडे आहे. एखादी व्यक्ती खरेदी करण्यासाठी नेमका किती पैसा खर्च करते हे त्यांना कसे कळणार? मंत्र्यांसाठी महागाई (Inflation) कधीच नसते, असे ते म्हणाले. भाजपा (BJP) खासदारांनी त्यांच्या पत्नींना विचारावे की, त्या किचन कसे चालवतात? असा सवालही त्यांनी केला.

    महागाईबाबत सरकारने दखल न घेतल्यास २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महागाई सरकारला खाऊन टाकेल. महागाईच्या मुद्द्यावरुनच भाजप सरकार सत्तेत आले. मात्र, आता ८ वर्षांच्या त्यांच्या सत्ताकाळात महागाईने उच्चांक गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर दुपटीने वाढले आहे. त्यामुळे गरिबांचे हाल होत असल्याचे टीकास्त्र अजमल यांनी मोदी सरकारवर सोडले.