
प्रत्येक पक्षात छोटे छोटे गट असतातच. प्रत्येत पक्षात आलबेल असते असे काही नाही. प्रत्येक पक्षात अंतर्गत गटबाजी, कुरघोडी नेत्यामधील मतभेद हे असतेच. मात्र, नेत्यांनी सामूहिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करावं, असं शशी थरुर म्हणाले. तसंच, भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांची प्रतिमा सुधारत असल्याचंही ते म्हणाले. जयपूर येथील लिटरेचर महोत्सवात ते बोलत होते.
जयपूर – काँग्रेस (congress) पक्षातील अंतर्गत कुरघोडी आणि पक्षाला अभूतपूर्व लागलेली गळती यामुळं पक्षाला घरघर लागली आहे. अनेक मोठे व दिग्गज नेते पक्षाला तिलांजली देत दुसरा मार्ग पत्कराताहेत. तसेच राज्या-राज्यातील काँग्रेस पक्षातील मतभेद याचा फटका पक्षाला बसतोय. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot यांच्यातील वाद सर्वांनी पाहिला आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी एक मोठं विधान केलं आहे.
दरम्यान, प्रत्येक पक्षात छोटे छोटे गट असतातच. प्रत्येत पक्षात आलबेल असते असे काही नाही. प्रत्येक पक्षात अंतर्गत गटबाजी, कुरघोडी नेत्यामधील मतभेद हे असतेच. मात्र, नेत्यांनी सामूहिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करावं, असं शशी थरुर म्हणाले. तसंच, भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी यांची प्रतिमा सुधारत असल्याचंही ते म्हणाले. जयपूर येथील लिटरेचर महोत्सवात ते बोलत होते. पुढे बोलताना थरुर म्हणाले की, मी माझ्या सहकार्यांना आवाहन करतो की, आपल्या सहकाऱ्यांबद्दल वादग्रस्त बोलणे योग्य नाही. आपण आपले म्हणणे वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो किंवा खासगीतही आपण आपलं मत देऊ शकतो. प्रत्येक पक्षात काही छोटे गट आहेत हे खरे आहे, पण मोठी गोष्ट म्हणजे आपण सगळेच भाजपाविरोधात आहोत. मोठ्या समस्यांच्या तुलनेत या छोट्या गोष्टी आहेत, असं थरुर म्हणाले.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यात पक्षांतर्गत वाद आहेत. यावर बोलताना थरुर म्हणाले की, “जेव्हा आपण आपल्या मित्रपक्षांबद्दल बोलतो तेव्हा आपण आपले शब्द विचारपूर्वक वापरावे. मला अभिमान आहे की, माझ्या १४ वर्षांच्या राजकीय आयुष्यात माझा कोणाशी असा प्रकारे वाद झाला नाही.” दरम्यान, भारतात असा एकही राजकीय पक्ष नाही ज्यात गट नाहीत, असं नाही. भाजपामध्ये (BJP) वैचारिक मतभेद नाहीत का? लोकशाहीत दोन व्यक्तींचे विचार वेगवेगळे असू शकतात, पण तुमची विचारधारा एक असेल आणि एका ध्येसासाठी लढत असाल तर शेवटी पक्षाचा विचार केला पाहिजे.