देशात कोरोनाचं थैमान, या पाच राज्यांत ८० टक्के रुग्ण

गेल्या २४ तासात महाराष्ट्रातून तब्बल ४०,४१४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. महाराष्ट्राखालोखाल कर्नाटकमधून ३०८२ रुग्णांची नोंद झालीय. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू आणि छत्तीसगड या राज्यांत ८४.५ टक्के कोरोना रुग्णांची संख्या आहे. तर महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, केरळ आणि छत्तीसगड या पाच राज्यांमध्येच देशातील ८० टक्के कोरोना रुग्ण असल्याचं सध्याची ताजी आकडेवारी दर्शवते आहे. 

    देशात कोरोनाचे थैमान सुरूच असून रोज कोरोना रुग्णांचे नवनवे आकडे समोर येत असल्याचं चित्र आहे. कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात पहिला नंबर असून गेल्या २४ तासांत महाराष्ट्रातून रेकॉर्डब्रेक केसेसची नोंद झालीय.

    गेल्या २४ तासात महाराष्ट्रातून तब्बल ४०,४१४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. महाराष्ट्राखालोखाल कर्नाटकमधून ३०८२ रुग्णांची नोंद झालीय. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू आणि छत्तीसगड या राज्यांत ८४.५ टक्के कोरोना रुग्णांची संख्या आहे. तर महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, केरळ आणि छत्तीसगड या पाच राज्यांमध्येच देशातील ८० टक्के कोरोना रुग्ण असल्याचं सध्याची ताजी आकडेवारी दर्शवते आहे.

    महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत प्रचंड मोठी असून महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या दिशेनं पावलं पडायला सुरुवात झाल्याचं सांगितलं जातंय. लॉकडाऊन करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला नुकत्याच दिल्या आहेत. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या अंशतः लॉकडाऊन करण्यात आलंय. मात्र इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील केेसेस प्रचंड वेगाने वाढत असल्याचं चित्र निर्माण झालंय.

    एकूण देशभरात १ कोटी १७ लाख जणांना कोरोनाची लागण झालीय. त्यापैकी १ कोटी १२ लाख जण बरे झालेत. सुमारे ३ लाख ९५ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एकूण ५ कोटी ३१ लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आलीय.