येत्या ६ ते ८आठवड्यांत देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता : डॉ. रणदीप गुलेरिया

पहिल्या आणि दुसर्‍या लाटे दरम्यान जे काही घडले यातून आपण काही शिकलो नाही. अनलॉक केल्यानंतर पुन्हा गर्दी वाढत आहे आणि लोक मोठ्या प्रमाणात एकत्र होत आहेत. राष्ट्रीय स्तरावर कोरोना रूग्णांची संख्या वाढण्यास थोडा वेळ लागेल. त्यामुळे येत्या पुढील सहा ते आठ आठवडे किंवा त्यापेक्षा काही दिवसांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

    गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून आता तिसरी लाट येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी शनिवारी चिंताजनक वक्तव्य केले आहे. कोरोना साथीची तिसरी लाट येत्या ६ ते ८ आठवड्यात देशात येऊ शकते आणि या लाटेवर नियंत्रण मिळवणं अशक्य असणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.