"This is an art, even Modi imitated it"; Who is the controversial Kalyan Banerjee?
"This is an art, even Modi imitated it"; Who is the controversial Kalyan Banerjee?

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली होती. या‌‌‌वरून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. कल्याण बॅनर्जी यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

    नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली होती. यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. या प्रकारावरून वाद निर्माण होताना दिसत आहे. त्यातच कल्याण बॅनर्जी यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करीत निशाणा साधला आहे.

    पंतप्रधान मोदी यांनीदेखील लोकसभेत नक्कल केली

    मला जगदीप धनखड यांच्याबाबत खूप आदर आहे. त्यांचे आणि माझे प्रोफेशन सारखे आहे. ते आमच्या राज्याचे माजी राज्यपाल आहेत. ते आपले उपराष्ट्रपती आहेत. मी केवळ एक कला सादर केली होती. पंतप्रधान मोदी यांनीदेखील भूतकाळात लोकसभेमध्ये नक्कल केली आहे. मी तुम्हाला ते दाखवू शकतो. सगळ्यांनी ते खेळीमेळीत घेतले होते. आम्ही ते गांभीर्याने घेतले नव्हते, असे कल्याण बॅनर्जी यांनी सांगितले.

    १४१ खासदारांचे संसदेतून निलंबन

    कल्याण बॅनर्जी यांच्यासह १४१ खासदारांचे संसदेतून निलंबन करण्यात आले आहे. कल्याण बॅनर्जी हे संसदेच्या बाहेर उपराष्ट्रपती यांची खिल्ली उडवताना दिसले. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक खासदार उपस्थित होते. राहुल गांधी यांनी व्हिडिओ शूटदेखील केला होता. यावरून आता सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना घेरण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांनीदेखील या घटनेला दुर्दैवी म्हटलं आहे.