हा शिवसेनेचा अंतर्गत विषय, लवकरच तिढा सुटेल मविआ सरकारला कोणताच धोका नाही – शरद पवार

नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद (Sharad Pawar press conference) घेत या सर्व प्रकारावर भाष्य केलं आहे. शिवसेनेचे काही आमदार नाराज असले तरी महाविकास आघाडी सरकारला (MVA) कोणताही धोका निर्माण होणार नाही. शिवसेनेचा (Shivsena) हा अंतर्गत विषय आहे, याचा लवकरच तिढा सुटेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. आज संध्याकाळी शरद पवार मुंबईला येणार आहेत.

    नवी दिल्ली : सोमवारी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडली. मविआ (BJP and MVA) या दोघांमध्ये अंत्यत चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपाचे पाचपैकी पाचही उमेदवार जिंकून आले आहेत. तर मविआचे सहापैकी पाच उमेदवार जिंकले असून, एक उमेदवार म्हणजे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये चलबिचलता तसेच सरकार अस्थिर होण्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या १३ समर्थक आमदारांसह (13 MLA)  नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे हे भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देऊ शकतात असं बोललं जात आहे. त्यामुळं राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, दिल्लीत शरद पवार व देवेंद्र फडणवीस (Sharad Pawar and Devendra fadnvis) हे आहेत. नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद (Sharad Pawar press conference) घेत या सर्व प्रकारावर भाष्य केलं आहे. शिवसेनेचे काही आमदार नाराज असले तरी महाविकास आघाडी सरकारला (MVA) कोणताही धोका निर्माण होणार नाही. शिवसेनेचा (Shivsena) हा अंतर्गत विषय आहे, याचा लवकरच तिढा सुटेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. आज संध्याकाळी शरद पवार मुंबईला येणार आहेत.

    सरकाल व्यवस्थित चालले होते, पण हे षढयंत्र केले गेले आहे, असं पवार म्हणाले. यावेळी मविआचे सरकार जर कोसळलं तर भाजपाला पाठिंबा देणार का असं विचारलं शरद पवारांना विचारले असताना तुम्ही असा प्रश्नच कसा विचारू शकता? आम्ही विरोधी बाकावरही बसू शकतो, असं शरद पवार म्हणाले. सरकार आजही ठाम आहे आणि यापुढेही राहिल असं शरद पवार यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.