This man eats '80 chapati, 3 kg rice, 2 kg mutton' every day

जगभरात सध्या लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. काही लोकांत ही समस्या मोठी असते. यामुळे त्यांचे खाद्यही दुसऱ्यांना आश्‍चर्यचकित करणारे असते. अशा लोकांच्या यादीत आता बिहारमधील कटिहार जिल्ह्याचा रहिवाशी रफीकचा समावेश करावा लागेल. अवघ्या 30 वर्षांचा असलेल्या रफीकचे वजन दोन क्‍विंटलहून अधिक आहे. त्याचे डाएटही वजनासारखे जास्त आहे. रफीक एकावेळच्या जेवणात तीन किलोचा भात, दोन किलो आट्याच्या रोट्या आणि दोन लिटर दूध खाऊ शकतो(This man eats '80 chapati, 3 kg rice, 2 kg mutton' every day ).

    पाटणा : जगभरात सध्या लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. काही लोकांत ही समस्या मोठी असते. यामुळे त्यांचे खाद्यही दुसऱ्यांना आश्‍चर्यचकित करणारे असते. अशा लोकांच्या यादीत आता बिहारमधील कटिहार जिल्ह्याचा रहिवाशी रफीकचा समावेश करावा लागेल. अवघ्या 30 वर्षांचा असलेल्या रफीकचे वजन दोन क्‍विंटलहून अधिक आहे. त्याचे डाएटही वजनासारखे जास्त आहे. रफीक एकावेळच्या जेवणात तीन किलोचा भात, दोन किलो आट्याच्या रोट्या आणि दोन लिटर दूध खाऊ शकतो(This man eats ’80 chapati, 3 kg rice, 2 kg mutton’ every day ).

    रफीक शेती करतो. गावातील लोकप्रतिनिधी व गावकऱ्यांच्या मते, एखाद्या कार्यक्रमात रफीकला निमंत्रित केल्यास तो सहजपणे तीन किलोचा भात आणि दोन किलो मटण फस्त करतो. वाढत्या वजनामुळे त्याला धड चालताही येत नाही. यामुळे तो नेहमी बुलेटचाच वापर करत असतो.

    जास्त वजनामुळे काहीवेळा त्याची बुलेट रस्त्यात अडकली तर लोकांना तिला धक्‍का देऊन बाहेर काढावे लागते. स्थानिक डॉक्टर मृणाल रंजन यांच्या मते, बुलिमिया नर्वोसा नामक आजारामध्ये वजन वेगाने वाढते. याशिवाय हार्मोनल आजारातही वजन वाढत असते. जोपर्यंत योग्य तपासण्या होत नाहीत, तोपर्यंत वजन वाढण्याचे कारण सांगणे अवघड असते.