2 लाख द्या, नाहीतर सिद्धू मुसेवाला करेल; पंजाबच्या व्यापाऱ्यांना धमकी

पंजाबमधील मानसा येथे गँगस्टर लॉरेन्स टोळीच्या नावाने व्यापाऱ्यांना धमकावले जात आहे. धमकीमध्ये त्यांना दोन लाख रुपये बँक खात्यात टाकण्यास सांगितले जात आहे. पैसे न दिल्यास पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाप्रमाणेच तुमचेही होईल, जेथे दिसाल तेथेच मारून टाकू, असेही धमकावण्यात येत आहे(Threats to Punjab traders).

  चंदीगड : पंजाबमधील मानसा येथे गँगस्टर लॉरेन्स टोळीच्या नावाने व्यापाऱ्यांना धमकावले जात आहे. धमकीमध्ये त्यांना दोन लाख रुपये बँक खात्यात टाकण्यास सांगितले जात आहे. पैसे न दिल्यास पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाप्रमाणेच तुमचेही होईल, जेथे दिसाल तेथेच मारून टाकू, असेही धमकावण्यात येत आहे(Threats to Punjab traders).

  एवढेच नाही तर आम्ही पोलिसांना घाबरत नाही, असेही धमकी देणाऱ्याने सांगितले. मुसेवाला यांची 29 मे रोजी मानसा येथील जवाहरके येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आतापर्यंत मानसातील 40 व्यापाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

  आता माझा फोन कट केला तर पोलिसांना फोन कर, असे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे. त्यांना सांग की मला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. शक्य तितक्या लवकर सुरक्षा मागवून घे. तुझ्या आयुष्यासाठी मी खूप छान गोष्ट सांगून ठेवली आहे. माझ्या लोकांना सांगितले आहे की, तुझा पाठलाग करून जिथे सापडेल तिथे तुला मारून टाका.

  बंदुकीच्या सर्व गोळ्या घालेन

  बंदुकीत लोड केलेल्या सर्व गोळ्या तुझ्या डोक्यात घालू. आता पाहत राहा तुझ्यासोबत काय होते ते? स्वतःला वाचवू शकत असशील तर वाचव. दुकान बंद करून पळून जाता येत असेल तर पळून जा. तुझ्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. नंबर बंद केल्याने किंवा फोन डिस्कनेक्ट केल्याने काहीही होणार नाही. आम्हाला ना पोलिस ठाण्याची भीती आहे ना पोलिसांची. आता आमच्यापासून वाचवून दाखव.

  लॉरेन्स गँगचा सदस्य म्हणून मागितले पैसे

  मानसाच्या व्यापाऱ्याने सांगितले की, मला दुपारी 1.15 वाजता फोन आला. मला सांगण्यात आले की, आम्ही गँगस्टर लॉरेन्सच्या टोळीकडून बोलत आहोत. जीव प्रिय असेल तर आम्हाला 2 लाख रुपये द्या. नाहीतर सिद्धू मुसेवालासोबत जे केले तसेच तुझे होईल. एक व्हीडिओही मला पाठवला आहे. ज्यामध्ये तो पिस्तुल लोड करत आहे. मला सांगत आहेत की, हे पिस्तूल तुझ्या डोक्यात रिकामे करेल. याबाबत एसएसपींसोबत आमची बैठक झाली आहे.

  आरोपीचे लोकेशन बिहारमध्ये : एसएसपी

  मानसाचे एसएसपी गौरव तुरा यांनी सांगितले की, ज्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले जात आहे. ते केवळ 3 दिवसांपूर्वी उघडलेले आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचे ठिकाणही बिहारमधून येत आहे. संपूर्ण प्रकरण सायबर सेलकडे पाठवण्यात आले आहे. धमकी देणाऱ्यांना लवकरच पकडले जाईल.