terrorists

श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर कुटुंबीयांनी ते निर्दोष असल्याचा दावा केला आहे. या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा असून दुसरा अकरावीत शिकत होता असा दावाही कुटुंबीयांनी केला आहे. बनावट चकमकीत यांची हत्या करून ते दहशतवादी असल्याचा दावा केला जात असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पोलिस आणि लष्कराकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ठार झालेले तिघेही दहशतवादी होते असे सांगितले आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर कुटुंबीयांनी ते निर्दोष असल्याचा दावा केला आहे. या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा असून दुसरा अकरावीत शिकत होता असा दावाही कुटुंबीयांनी केला आहे. बनावट चकमकीत यांची हत्या करून ते दहशतवादी असल्याचा दावा केला जात असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पोलिस आणि लष्कराकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ठार झालेले तिघेही दहशतवादी होते असे सांगितले आहे. सोबतच रेकॉर्डमध्ये त्यांची दहशतवादी म्हणून नोंद नव्हती अशी माहिती दिली आहे. ठार करण्यात आलेल्या तीनही दहशतवाद्यांचा आमच्या यादीत उल्लेख नसला तरी त्यातील दोघे कट्टर दहशतवादी होते, अशी माहिती पोलिसांनी त्यांच्या निवेदनात दिली आहे. पोलिसांनी यावेळी “ओजीडब्ल्यू” किंवा “ओव्हर ग्राउंड वर्कर” असा उल्लेख केला आहे. जम्मू काश्मीरमधील एखाद्या व्यक्तीचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय असल्यास हा शब्द वापरला जातो. पोलिसांनी चकमकीत ठार झालेला एकजण हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी रईस कचरू याचा नातेवाईक होता, असे सांगितले आहे. चकमकीत ठार झालेल्यांची ओळख पटली असून एजाज गणी, अथर मुश्ताक आणि झुबीर अशी नावे आहेत. एजाज हा हेड कॉन्स्टेबलचा मुलगा असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.