file photo
file photo

विस्तारा दलम प्लाटून ५६ आणि दादेक्सा दलमच्या तीन नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे. बालाघाटचे (Balaghat) पोलीस अधीक्षक समीर सौरभ आणि आयजी संजय सिंह जंगलात उपस्थित आहेत. त्यामुळे याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

    बालाघाट : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त (Naxalite) लांजी भागापासून १५ किमी अंतरावर असलेल्या खंडापाडी ग्रामपंचायतीच्या कांडला गावाच्या जंगलात पोलीस (Police) आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxalist) चकमक झाली. यामध्ये विस्तारा दलम प्लाटून ५६ आणि दादेक्सा दलमच्या तीन नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे. बालाघाटचे (Balaghat) पोलीस अधीक्षक समीर सौरभ आणि आयजी संजय सिंह जंगलात उपस्थित आहेत. त्यामुळे याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

    ठार झालेल्या तीन नक्षलवाद्यांचे वय ३५ ते ४० वर्षेदरम्यान आहे. त्यापैकी एका नक्षलवाद्यावर बक्षीसही लावण्यात आले आहे. ही चकमकीची घटना बहेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलीस लवकरच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देतील, अशी शक्यता आहे.

    सूत्रांचे म्हणणे आहे की, महाराष्ट्र (Maharashtra) आणि छत्तीसगडला (Chhattisgarh) लागून असलेल्या लांजी परिसरात ही चकमक झाली. डोवरवेली चौकीवर तैनात असलेल्या हॉक फोर्सला (Hock Force) जंगलात नक्षलवाद्यांची हालचाल असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांचे पथक तेथून शोधासाठी निघून गेले. यावेळी, तीन सशस्त्र नक्षलवादी जंगलात दिसून आले. जवान पाहून त्यांनी नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. या चकमकीत तीनही नक्षलवादी ठार झाले. पोलीस सध्या उर्वरित जंगल परिसरात शोध मोहीम राबवत आहेत.