ओडिशात मालगाडी घसरून तीन प्रवाशांचा मृत्यू; सात जण जखमी

जाजपूर जिल्ह्यातील कोराई रेल्वे स्थानकावर आज सकाळी मालगाडी रुळावरून घसरली. यावेळी, गाडीची प्रतिक्षा करणाऱ्या तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

    भुवनेश्वर – ओडिशाच्या (Odisha) जाजपूर जिल्ह्यातील कोराई रेल्वे स्थानकावर (Korai Raikway Station) आज सकाळी मालगाडी रुळावरून (Goods Train) घसरली. यावेळी, गाडीची प्रतिक्षा करणाऱ्या तीन प्रवाशांचा मृत्यू (Passengers Death) झाला असून सात जण जखमी झाले आहेत, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

    ईस्ट कोस्ट रेल्वे (ECoR) अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी ६.४४ च्या सुमारास काही लोक प्लॅटफॉर्म आणि वेटिंग हॉलमध्ये प्रवासी ट्रेनची वाट पाहत असताना हा अपघात झाला. स्टेशन कर्मचार्‍यांनी सांगितले की, डोंगोआपोसीहून छत्रपूरकडे जाणाऱ्या रिकाम्या मालगाडीच्या लोको पायलटने अचानक ब्रेक लावला, ज्यामुळे आठ वॅगन्स रुळावरून घसरल्या. यावेळी, प्लॅटफॉर्म आणि वेटिंग हॉलमधील प्रवाशांवर हे डब्बे गेले.

    बचाव कार्यावर लक्ष ठेवणारे जाजपूरचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अक्षय कुमार मल्लिक यांनी सांगितले की, रुळावरून घसरलेल्या काही वॅगन्स फूट-ओव्हर ब्रिजवर चढल्या. तसेच, वेटिंग हॉल आणि तिकीट काउंटरवर पडल्या आहेत.