delhi school bus accident

दिल्लीत (Delhi) 3 स्कूल बसने (School Bus Accident एकमेकांना जोरदार धडक (Delhi School Bus Accident News) दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    नवी दिल्ली: दिल्लीत (Delhi) 3 स्कूल बसची (School Bus Accident) एकमेकांना जोरदार धडक (Delhi School Bus Accident News) दिल्याची धक्कादायक घटना इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमच्या जवळ घडली. या तीन बसपैकी एका बसमध्ये शाळकरी विद्यार्थी प्रवास करीत होते. धडक इतकी जबरदस्त होती की या बसचा समोरचा भाग पूर्णपणे नष्ट झालेला आहे. बसला झालेल्या अपघातानंतर काही काळ हे विद्यार्थी सुन्न झालेले होते. जीव वाचवण्यासाठी या मुलांनी खिडकीतून उड्या मारल्याची माहिती आहे. सुदैवानं या अपघातात कुणाचाही मृत्यू किंवा दुखापत झाली नसल्याची माहिती समोर येतेय. मात्र हा सगळा प्रकार कसा घडला हे ऐकल्यावर तुम्हाला संताप आल्याशिवाय राहणार नाही.

    तिन्ही बसचा एकमेकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न
    या तिन्ही बसचे ड्रायव्हर हे एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होते. त्याचवेळी हा प्रकार घडला. या तिन्ही बसच्या ड्रायव्हरची जीवघेणी स्पर्धा मुलांच्या जीवावर बेतू शकली असती. मात्र याचं भान या तिन्ही बस ड्रायव्हर्सना नसल्याचं आता समोर येतं आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून या प्रकरणात आता अधिक तपास करण्यात येतोय.

    स्कूल बस किती सुरक्षित?
    स्कूल बसचा मुद्दा या अपघाताच्या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्कूल बसमधून दिवसाला लाखो विद्यार्थी प्रवास करीत असतात. पालकही बिनघोरपणे या स्कूल बस चालकांच्या आणि शाळांच्या भरवसावर विद्यार्थ्यांना सोडतात. मात्र अशा ड्रायव्हर्सच्या बेजबाबदार वर्तनाचा फटका अनेकदा विद्यार्थी आणि पालकांना सहन करावा लागतो. याबाबत अनेकदा वेगवेगळ्या व्यासपीठांवर चर्चाही झडलेल्या आहेत. मात्र तरीही हे प्रकार थांबताना दिसत नाहीत. यासाठी कठोर उपाययोजना आणि नियम असण्याची गरज सातत्यानं वर्तवण्यात येतेय.