mp srushti death in borewell

मध्य प्रदेशच्या सीहोर जिल्ह्यातल्या मुंगावली येथे राहणारी तीन वर्षांची सृष्टी खेळता खेळता अचानक शेतातील बोअरवेलमध्ये पडली. ती बोअरवेलमध्ये पडली त्यावेळी ती 20 फूटांवर अडकली होती. पण बचावकार्य सुरु होईपर्यंत ती आणखी खाली गेली आणि 100 फूटांवर जाऊन अडकली होती.

    सीहोर: मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्या सृष्टीचा 50 तासांपेक्षा जास्त वेळ जगण्यासाठी संघर्ष सुरु होता. (Girl Fell Into Borewell) दुर्दैवाने आज तिचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशच्या सीहोर जिल्ह्यातल्या मुंगवली गावामध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे.

    चिमुकल्या सृष्टीला सुखरुप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कराचे जवान तसेच जिल्हा प्रशासनाकडून अथक प्रयत्न करण्यात आले. पण त्यांचे हे प्रयत्न अपयशी ठरले. सृष्टीला वाचवण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफसोबत लष्कर या कामासाठी आलं होतं. अखेर गुरुवारी गुजरातमधून रोबोटिक टीमदेखील बोलावण्यात आली होती. रोबोटिक टीमने सृष्टीला बोअरमधून बाहेर काढलं आणि त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सृष्टीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांसह सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

    मध्य प्रदेशच्या सीहोर जिल्ह्यातल्या मुंगावली येथे राहणारी तीन वर्षांची सृष्टी खेळता खेळता अचानक शेतातील बोअरवेलमध्ये पडली. ती बोअरवेलमध्ये पडली त्यावेळी ती 20 फूटांवर अडकली होती. पण बचावकार्य सुरु होईपर्यंत ती आणखी खाली गेली आणि 100 फूटांवर जाऊन अडकली होती. त्यामुळे तिला वाचवण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. सृष्टीला पाईपच्या सहाय्याने ऑक्सिजन दिला जात होता. सृष्टीला वाचवण्यासाठी 50 तास शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण तिला वाचवणं शक्य झालं नाही.

    दरम्यान, बिहारमध्ये पुलाच्या पिलरमध्ये अडकलेल्या 12 वर्षांच्या मुलाचा देखील मृत्यू झालाय. अनेक प्रयत्न केल्यानंतरही या मुलाला वाचवण्यात यश आलं नाही. मुलगा पुलाच्या पिलरमध्ये कसा अडकला हेच कोणाला समजत नव्हतं. त्याला त्याठिकाणावरुन काढणं कठीण होतं पण त्याला वाचवता आलं नाही. दोन दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता. त्याला शोधत असताना तो रोहतासच्या सोन नदीच्या पुलामध्ये अडकला होता. त्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्याला बाहेर काढता आलं नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाला सांगितलं. बरेच प्रयत्न करुन देखील त्याला वाचवता आलं नाही.