‘ती आमची चूकच’; ममता बॅनर्जी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

देशातील राजकारणात (Indian Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी भाजप आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : देशातील राजकारणात (Indian Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी भाजप आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ‘केंद्रातील मोदी सरकार बंगालच्या योजनांसाठी पैसे देत नाही. केंद्र सरकारने 7000 कोटी रुपये दिलेले नाहीत. या विरोधात उद्या दुपारपासून 48 तास धरणे धरणार आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच ‘जीएसटीचे (GST) समर्थन करणे ही आमची चूक होती’, असेही त्यांनी सांगितले.

ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकार निशाणा साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘केंद्र सरकार पश्चिम बंगालच्या योजनांसाठी पैसे देत नाही. केंद्र सरकारने 7000 कोटी रुपये दिलेले नाहीत. या विरोधात उद्या दुपारपासून 48 धरणे धरणार आहे. 100 दिवसांच्या कामाचे पैसे आणि ओबीसीचे पैसे केंद्राने बंद केले. मात्र, आता 100 दिवसांत रस्तेबांधणीचे काम होणार आहे. केंद्र सरकारने अद्याप आम्हाला 7000 कोटी रुपये दिलेले नाहीत’.

सिंगूरमध्ये धरणे

ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी सिंगूरमध्ये धरणे धरले. त्यावर त्या म्हणाल्या, ‘सध्या शेतकऱ्यांच्या घरांना आग लागली आहे. उद्या दुपारी १२ वाजल्यापासून आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे धरणार आहे. लोकशाहीच्या हत्येलाही उत्तर द्यावे लागेल. कोणी काही बोलले तर त्याच्यावर ईडी आणि सीबीआय लावली जाते.