शहरातील टोल माफ करणार; नितीन गडकरींची माहिती

राज्यसभेतील सदस्यांनी एक्स्प्रेस-वेवर शहरांच्या हद्दीत टोल प्लाझा उभारण्याचा मुद्दा उपस्थित करत चिंता व्यक्त केली होती. स्थानिकांनाही प्रवास करताना टोल भरावा लागतो. यावेळी गडकरींनी शहरातील टोल माफ केला जाईल असे स्पष्ट केले.

    नवी दिल्ली : १० किलोमीटर रस्त्याच्या वापरासाठी लोकांना ७५ किलोमीटरचा टोल भरावा लागतो. हा मागील सरकारचा दोष आहे, शहरातील टोल माफ (City Toll Waive) केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली. राज्यसभेत (Rajya Sabha) बोलताना त्यांनी ही माहिती दिली असून यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    राज्यसभेतील सदस्यांनी एक्स्प्रेस-वेवर (Express Way) शहरांच्या हद्दीत टोल प्लाझा (Toll Plaza) उभारण्याचा मुद्दा उपस्थित करत चिंता व्यक्त केली होती. स्थानिकांनाही प्रवास करताना टोल भरावा लागतो. यावेळी गडकरींनी शहरातील टोल माफ केला जाईल असे स्पष्ट केले.

    सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने, पण एक्स्प्रेस-वेवरील टोलचा फादर ऑफ टोल टॅक्स (Father Of Toll Tax) मीच आहे. मीच या देशात बीओटीचा सर्वात पहिला प्रकल्प आणला. महाराष्ट्रातील ठाणे-भिवंडी बायपास हा पहिला प्रकल्प होता. आता आम्ही एक नवीन पद्धत सुरू करत आहोत, ज्यामध्ये टोलमधून शहरी भाग वगळला जाईल, त्यांच्याकडून टोल घेतला जाणार नाही, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.