इस्त्रोसाठी आज महत्त्वाचा दिवस; चंद्राच्या जवळ पोहचणार चांद्रयान 3, अजून किती दिवस…

चंद्राभोवती अंडाकृती कक्षेत प्रदक्षिणा घालत 14 ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत चांद्रयान - 3 चंद्रापासून 100 मीटर अंतरावर असले. इंधनाचा कमीत कमी वापर करता यावा तसेच चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत चांद्रयान - 3 स्थिरावे याकरीता प्रत्येक कक्षेत वेग कमी करत हे  यान मार्गक्रमण करत आहे.  

  नवी दिल्ली – भारतासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तसेच इस्त्रोसाठी (Isro) आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण आता चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहिम अत्यंत महत्वाच्या टप्प्यात आली आहे. 14 ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत चांद्रयान – 3 चंद्रापासून केवळ 100 मीटर अंतरावर पोहचणार आहे. त्यामुळं आजचा दिवस इस्त्रोसाठी तसेच सर्व भारतीयासांठी खूप महत्त्वाचा आहे. चांद्रयान 3 चा चंद्रापर्यंतचा प्रवास 40 दिवसांचा आहे. (Today is an important day for Isro; Chandrayaan 3 will reach the moon, how many more days)

  40 दिवसांचा प्रवास

  मिळालेल्या माहितीनुसार चंद्राभोवती अंडाकृती कक्षेत प्रदक्षिणा घालत 14 ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत चांद्रयान – 3 चंद्रापासून 100 मीटर अंतरावर असले. इंधनाचा कमीत कमी वापर करता यावा तसेच चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत चांद्रयान – 3 स्थिरावे याकरीता प्रत्येक कक्षेत वेग कमी करत हे  यान मार्गक्रमण करत आहे.  14 जुलै 2023 रोजी भारताच्या चांद्रयान 3 ने चंद्राच्या दिशेने अवकाशात झेपावले. श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून दुपारी बरोब्बर 2 वाजून 35  मिनिटांनी रॉकेट चंद्राकडे झेपावलं. LVM 3 या लाँच व्हेईकलमधून चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात आलं.

  सॉफ्ट लँडिग कधी?

  40 दिवसांच्या प्रवासानंतर  17 ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल वेगळे होणार आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरणार आहे. त्यानंतर  23 ते 24ऑगस्ट दरम्यान चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. चांद्रयान 3 हे थेट चंद्राच्या दिशेने न जाता  प्रथम अंडाकृती कक्षेत पृथ्वीभोवती घिरट्या घालत मार्गक्रमण केले.

  रशियाचे  Luna-25 यान

  दरम्यान, दुरीकडे रशियाचे  Luna-25 हे यान हे देखील चंद्र मोहिमेसाठी अवकाशात झेपावले आहे. तर रशियाचे लुना 25 यान 10 दिवसांत चंद्रावर पोहचणार आहे. चांद्रयान 3 की लुना 25 कुणाचे यान सर्वप्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग करणार याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. रशियानं 47 वर्षांनंतर पहिल्यांदाच चंद्रावर यान पाठवलंय. रशियाचे Luna-25 हे यान भारतीय वेळेनुसार 11 ऑगस्ट मध्यरात्री 3.30 वाजता अवकाशात झेपावले. रशियाची राजधानी मॉस्कोपासून पूर्वेला 5550 किमी अंतरावर असलेल्या व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम येथील अंतराळ केंद्रातून  रशिया सोयुझ-2 सर्वात उंच आणइ अत्यंत पावरफुल रॉकेटच्या मदतीने  हे यान प्रक्षेपित करण्यात आले.