आज पंतप्रधान मोदी दीक्षांत समारंभाला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात पोहोचणार आहेत. दुपारी 1 वाजता ते राजभवनात परततील, त्यानंतर ते अहमदाबादच्या नवरंगपुरा भागातील सरदार पटेल स्टेडियममध्ये सायंकाळी 6 ते 8 या वेळेत खेळ महाकुंभाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील. यानंतर, रात्री 8.30 वाजता पंतप्रधान मोदी विशेष विमानाने दिल्लीला रवाना होतील.
देशातील चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी अहमदनगरमध्ये रोड शो केला. पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद विमानतळ ते भाजप कार्यालय ‘कमलम’पर्यंत असा 10 किमी लांबीचा रोड शो केला. यानंतर त्यांनी गुजरात पंचायत महासंमेलनाला संबोधित केले. तसेच पंतप्रधान मोदी यांनी गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेट घेतली. मोदींची आईसोबत दोन वर्षांनंतर भेट झाली. यावेळी त्यांनी पहिल्यांदा आईचे आशीर्वाद घेतले आणि एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला.
पंतप्रधान मोदींचा आजचा कार्यक्रम