आज प्रमोद सावंत गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बडे नेते उपस्थित राहणार, 9 मंत्री सुद्धा घेणार शपथ

आज प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सलग दुसऱ्यांदा ते गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेणार आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. प्रमोद सावंत यांच्यासह 9 जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

    पणजी : देशात पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपाने चार राज्यात मुसंडी मारली आहे. त्यामुळं जिंकलेल्या राज्यात आता भाजपा आपली सत्ता स्थापन करत आहे. यूपीत २५ तारखेला आदित्यनाथ योगी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर  गोवा मुख्यमंत्र्यांची शपथ आज प्रमोद सावंत घेणार आहेत. मागील आठवड्यात भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. तसेच सत्ता स्थापनबाबत तसेच मंत्रीपदाबाबत चर्चा झाली. आज प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सलग दुसऱ्यांदा ते गोव्याच्या मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेणार आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. प्रमोद सावंत यांच्यासह 9 जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

    दरम्यान, मागील आठवड्यात आमदारांचा गट ज्या नेत्याला निवडतील, तो सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांना संपर्क साधतील. त्यामुळं उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान आजच्या गोव्यातील शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीसह देशातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून गोव्याच्या निवडणुकीत प्रभारी राहिलेले देवेंद्र फडणवीस सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांसह अन्य नऊ मंत्र्यांना सुद्धा शपथ दिली जाणार आहे.

    या सोहळ्यासाठी बडे नेते उपस्थित राहणार असल्यामुळं मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तसेच कडेकोट पोलीस यंत्रणा सुद्धा तैनात करण्यात आली आहे. कोणतही गालबोट लागू नये, यासाठी प्रत्येकाची तपासणी करुनच आत सोडण्यात येणार आहे. सांयकाळी हा शपथविधी पार पडणार आहे.