आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमधून देशाला संबोधित करणार…

    नवी दिल्ली : आज सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. मोदी आज मन की बातमधून कोरोनाचा आकडा आणि लसीकरणाचा वेग या स्थितीवर चर्चा करण्याची शक्यता आहे. मन की बात कार्यक्रम आकाशवाणी, दूरदर्शन समाचार, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रसारित होईल. हे त्यांचं 78 वं संबोधन असेल.

    मोदींचा हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन समूह नेटवर्क किंवा आकाशवाणीच्या वेबसाईट सोबतच अॅपवरही प्रसारित होणार आहे. सकाळी आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात देशातील लोकांसोबत आपले विचार शेअर करतील.

    दरम्यान, काही दिवसांपूर्वी मोदींनी जम्मू काश्मीरमधील सर्वपक्षीय गुपकार नेत्यांची दिल्लीत बोलावली होती. या बैठकीत या सर्वपक्षीय नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या. यानंतर मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं. यासंदर्भातही नरेंद्र मोदी आजच्या मन की बातमध्ये बोलण्याची शक्यता आहे.