चंद्र उद्या रात्री ३० टक्के मोठा दिसणार

मंगळवार १४ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेच्या रात्री आकाशात 'सुपरमून' (Super Moon)दर्शन देणार आहे, असे खगोल अभ्यासक (Astronomer), पंचांगकर्ते दा. कृ. सोमण (D.K. Soman) यांनी सांगितले.

    मंगळवार १४ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेच्या रात्री आकाशात ‘सुपरमून’ (Super Moon)दर्शन देणार आहे, असे खगोल अभ्यासक (Astronomer), पंचांगकर्ते दा. कृ. सोमण (D.K. Soman) यांनी सांगितले. सोमण म्हणाले की, चंद्र पृथ्वी(Earth)पासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. जर, पौर्णिमे(Pornima)च्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर तो आकाराने १४ टक्के मोठा आणि तीस टक्के जास्त तेजस्वी दिसतो. अशा चंद्राला ‘सुपरमून’ म्हणतात.

    मंगळवारी रात्री चंद्र पृथ्वीपासून ३ लक्ष ५७ हजार ४३४ कि.मीटर अंतरावर पृथ्वीजवळ येणार आहे. सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी चंद्र उगवणार असून रात्रभर सुपरमूनचे दर्शन देऊन सकाळी ६ वाजून २९ मिनिटांनी मावळणार आहे. यानंतर या वर्षातील शेवटचे सुपरमून दर्शन आषाढ पौर्णिमेच्या रात्री बुधवार १३ जुलै २०२२ होणार आहे. परंतु, त्यावेळी पावसामुळे आकाश अभ्राच्छादित असणार आहे, असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.