टॉप फॅशन डिझायनर हैदराबादच्या राहत्या घरी मृतावस्थेत सापडली, पोलिसांना आत्महत्येचा संशय

बंजारा हिल्सच्या सर्कल इन्स्पेक्टरने सांगितले की ती बाथरूममध्ये पडलेली आढळली आणि तिचा मृतदेह पीएमईसाठी उस्मानिया हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला आहे. तीने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.

    तेलंगणा: प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेला (Prathyusha Garimella ) शनिवारी तेलंगणातील हैदराबाद (Hyderabad) येथील तिच्या बंजारा हिल्स येथील निवासस्थानी संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आली. तिने बंजारा हिल्समध्ये फॅशन स्टुडिओ चालवला आणि टॉलीवूड, बॉलीवूड आणि इतर क्षेत्रातील अनेक दिग्ज तीचे ग्राहक देखील होते.

    बंजारा हिल्सच्या सर्कल इन्स्पेक्टरने सांगितले की ती बाथरूममध्ये पडलेली आढळली आणि तिचा मृतदेह पीएमईसाठी उस्मानिया हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला आहे. तीने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.

    पोलिसांनी तीच्या बेडरूममधून कार्बन मोनॉक्साइड सिलिंडर जप्त केला आहे. याप्रकरणी बंजारा हिल्स येथे संशयास्पद मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.