holi festival

गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा फैलाव वाढू नये, हा हेतून देशात होळी साजरी करण्यावर बंदी घालण्यात आलीय. मात्र त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसमोर अस्तित्वाचं संकट उभं राहिलंय. याअगोदर दिवाळी सणावरही कोरोनाचे सावट असल्यामुळे दिवाळी साधेपणानं साजरी करण्याचे आदेश सरकारनं दिले होते. दिवाळीतही साहित्याची विक्री घटल्यामुळे व्यापारी संकटात आले होते. आता होळीवरदेखील संक्रांत आल्यामुळे धंदा कसा करायचा, असा मोठा प्रश्न व्यापाऱ्यांपुढे आहे. 

    कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरुवात केलीय. देशातल्या अनेक राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात तर देशातील सर्वाधिक रुग्ण असल्याचं चित्र दिसतंय. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशभरात कुठेही होळी साजरी करण्याला मनाई केलीय.

    गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा फैलाव वाढू नये, हा हेतून देशात होळी साजरी करण्यावर बंदी घालण्यात आलीय. मात्र त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसमोर अस्तित्वाचं संकट उभं राहिलंय. याअगोदर दिवाळी सणावरही कोरोनाचे सावट असल्यामुळे दिवाळी साधेपणानं साजरी करण्याचे आदेश सरकारनं दिले होते. दिवाळीतही साहित्याची विक्री घटल्यामुळे व्यापारी संकटात आले होते. आता होळीवरदेखील संक्रांत आल्यामुळे धंदा कसा करायचा, असा मोठा प्रश्न व्यापाऱ्यांपुढे आहे.

    दरवर्षी होळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात चीनहून माल येत असतो. सुमारे १० हजार कोटी रुपयांची आयात चीनवरून करण्यात येते. यंदा व्यापाऱ्यांनी चिनी मालावर बहिष्कार घालत स्वदेशी माल तयार केला होता. मात्र त्या मालाला खपच नसल्यामुळे देशभरात सुमारे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक पडून असल्याचं चित्र आहे.

    विशेषतः उत्तर भारतात होळी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. मात्र यावेळी लॉकडाऊनमुळे आणि कोरोना निर्बंधांमुळे लोक घराबाहेरच पडले नाहीत, तर होळी कशी खेळणार आणि आपलं साहित्य कोण खरेदी करणार, असा सवाल सध्या या व्यापाऱ्यांना सतावतो आहे. होळीच्या दरम्यान चौकाचौकात आणि नाक्यानाक्यावर लोक एकत्र येत होळी साजरी करत असतात. यावेळी छोट्या व्यापाऱ्यांचा चांगला व्यवसाय होत असतो. मात्र यावेळी हे चित्र दिसणार नसल्यामुळे व्यापारी धास्तावलेत.