guwahati trinmul congress

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमदारांसोबत थांबलेल्या गुवाहाटीमधील (Guwahati) हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरु आहे. राज्यात पूर आला असून लोकांचा जीव जात असताना महाराष्ट्रातील लोकांचं आदरातिथ्य केलं जात असल्याने तृणमूलच्या (TMC Leader Protest) नेत्यांनी आक्षेप घेतला.

    महाराष्ट्रात महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi) सरकार कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांचा एक गट गुवाहाटीला गेला आहे. अशातच तृणमूल काँग्रेसने (TMC Protest) यावर टीका केली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आमदारांसोबत थांबलेल्या गुवाहाटीमधील (Guwahati) हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरु आहे. राज्यात पूर आला असून लोकांचा जीव जात असताना महाराष्ट्रातील लोकांचं आदरातिथ्य केलं जात असल्याने तृणमूलच्या नेत्यांनी आक्षेप घेतला.

    एकनाथ शिंदे इतर आमदारांसोबत गुवाहाटीमधील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये थांबले आहेत. या हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते भाजपाविरोधात आंदोलन करत आहेत. आसामला पुराचा फटका बसला असताना भाजपा घोडेबाजार करण्यात व्यस्त आहे. केंद्राकडून एक रुपयाची मदतही अद्याप मिळालेली नाही. आमदारांची विक्री सुरु आहे, अशी टीका तृणमूलच्या नेत्याने केली आहे.

    तृणमूलचे नेते रिपून बोरा यांना इतर आंदोलकांसहित पोलिसांनी हटवलं आहे. बोरा यांनी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्यावर टीका करताना पुरामुळे लोकांचा जीव जात असताना महाराष्ट्रातील आमदारांचं आदरातिथ्य करण्यात व्यग्र आहेत अशी टीका केली आहे. दरम्यान आसामचे कॅबिनेट मंत्री अशोक सिंघल रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी शिवसेना आमदारांची भेट घेतली आहे. दुसरीकडे आसामचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करत आहेत.