assam flood

आसाममधील साधारण 12 जिल्हे पुरामुळे प्रभावित झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ही परिस्थिती अधिक गंभीर होतेय. त्यामुळे 14 हजारपेक्षा जास्त नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय.

    महाराष्ट्रात (Maharashtra) पाऊस फारसा पडत नसला तरी देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. आसाममध्ये गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे (Assam Flood) 31 पैकी 20 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती जाणवतेय. आत्तापर्यंत साधारण 5 लाख लोकांचं पुरामुळे नुकसान झालंय. (Assam Rain)

    20 जिल्हे पुरामुळे प्रभावित,14 हजारपेक्षा जास्त नागरिकांचं स्थलांतर
    आसाममधील साधारण 20 जिल्हे पुरामुळे प्रभावित झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ही परिस्थिती अधिक गंभीर होतेय. त्यामुळे 14 हजारपेक्षा जास्त नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. छावण्यांमध्ये त्यांना आश्रय घ्यावा लागतोय.

    आसाम राज्यातील तामुलपूरमधील कुमारिकाटा भागातील एक पूल (Bridge Collapsed In Assam) मोडकळीला आलाय. इथे पुरामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली आहे. बजाली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी साचलं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

    780 गावं पाण्याखाली
    मीडिया रिपोर्टनुसार, आसामच्या बक्सा, बारपेटा, चिरांग, दरांग, धुबरी, डिब्रूगढ. कामरूप, कोकराझार, लखीमपूर, नलबाडी, सोनितपुर आणि उदलगुरी जिल्ह्यात पावसामुळे साधारण पाच लाखहून जास्त लोकांचं नुकसान झालंय. याशिवाय बारपेटामध्ये 3,25,600 लोकांचं, नलबाडीमध्ये 77,700 लोकांचं आणि लखीमपूरमध्ये 25,700 लोकांचं पुरामुळे नुकसान झालं आहे.याशिवाय 10 हजारांवर एकर शेतीचं नुकसान झालं आहे. साधारण 780 गावं पाण्याखाली गेली आहेत.

    ऑरेंज अलर्ट जारी
    हवामान खात्याने (IMD) अति मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन ऑरेंज अलर्ट (Orange Alert For Assam) दिला आहे. ब्रह्मपुत्रेची उपनदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.