मस्क आणणार शून्य जाहिरात सबस्क्रिप्शन, कंपनीची 90 टक्के कमाई जाहिरातीमधून

ट्विटर त्याच्या कमाईपैकी 90 टक्के जाहिरातींमधून कमावते. ऑक्टोबरमध्ये मस्कच्या ट्विटर अधिग्रहणानंतर कंपनीच्या जाहिरात महसूलात झपाट्याने घट झाली आहे. द इन्फॉर्मेशनने प्रकाशित केलेल्या अलीकडील अहवालानुसार, गेल्या मंगळवारी दैनंदिन महसूल एका वर्षापूर्वीच्या याच दिवसाच्या तुलनेत 40 टक्के कमी होता.

    नवी दिल्ली – मायक्रोब्लॉगिंग फ्लॅटफॉर्म ट्विटर चे मालक एलन मस्क यांनी नुकतीच आणखी एक घोषणा केली आहे. ज्यामध्ये ते म्हणाले की, शून्य (ZERO) झीरो जाहिरातींसह हायर प्राईज्ड सदस्यता मॉडेलचा प्लॅन आणणार आहे. मस्क म्हणाले, ट्विटरवरील जाहिराती खूप वारंवार आणि खूप मोठ्या असतात. येत्या आठवडाभरात ही दोन्हीसाठी पावले उचलली जातील. तथापि, सबस्क्रिप्शन मॉडेलची किंमत कशी असेल आणि ते कोणत्या तारखेपर्यंत आणले जाईल हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

    ट्विटरची 90 टक्के कमाई जाहिरातीतून
    ट्विटर त्याच्या कमाईपैकी 90 टक्के जाहिरातींमधून कमावते. ऑक्टोबरमध्ये मस्कच्या ट्विटर अधिग्रहणानंतर कंपनीच्या जाहिरात महसूलात झपाट्याने घट झाली आहे. द इन्फॉर्मेशनने प्रकाशित केलेल्या अलीकडील अहवालानुसार, गेल्या मंगळवारी दैनंदिन महसूल एका वर्षापूर्वीच्या याच दिवसाच्या तुलनेत 40 टक्के कमी होता. मस्क यांनी महसुलातील घट बाबत अधिकार संस्थांवर दोष दिला, ज्यांनी ब्रँडवर जाहिराती थांबवण्यासाठी दबाव आणला.

    ब्लू ची परवडणारी वार्षिक योजना सादर
    यापूर्वी ट्विटरने ब्लू सबस्क्रिप्शनसाठी नवीन वार्षिक योजना सादर केली होती. मासिक योजनेच्या तुलनेत ही योजना फायदेशीर आहे. ट्विटर ब्लूच्या मासिक योजनेची किंमत $8 आहे. परंतू वार्षिक योजना $84 मध्ये खरेदी केली जाऊ शकते. म्हणजेच वार्षिक योजनेवर सुमारे 22 डॉलरची बचत होईल. यामध्ये युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपान यांचा समावेश आहे.