आंध्र प्रदेशात प्रक्षोभक संदेश प्रसारित करणाऱ्या दोघांना अटक; तिरुपती रेल्वे स्टेशन उडवण्याचा होता कट

पोलिसांनी सांगितले कि, काही लोक सोशल मीडियावर तरुणांना भडकावण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. त्यानंतर तातडीने कारवाई करून दोघांना अटक करण्यात आली. राजेश आणि रुपेश अशी दोघांची ओळख समोर येत आहे. ते तिरुपती जिल्ह्यातील यारावरीपालम येथील रहिवासी आहेत. बातम्यांनुसार, त्यांच्या फोनवरून उघड झाले आहे कि त्यांचा तिरुपती रेल्वे स्थानकही उडवण्याचा कट होता.

  नवी दिल्ली – अग्निपथ योजनेच्या विरोधात सोशल मीडियावर प्रक्षोभक संदेश प्रसारित केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. या दोघांनी तिरुपती रेल्वे स्टेशन उडवण्याचाही कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या दोघांची चौकशी सुरु असून तिरुपती स्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

  पोलिसांनी सांगितले कि, काही लोक सोशल मीडियावर तरुणांना भडकावण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. त्यानंतर तातडीने कारवाई करून दोघांना अटक करण्यात आली. राजेश आणि रुपेश अशी दोघांची ओळख समोर येत आहे. ते तिरुपती जिल्ह्यातील यारावरीपालम येथील रहिवासी आहेत. बातम्यांनुसार, त्यांच्या फोनवरून उघड झाले आहे कि त्यांचा तिरुपती रेल्वे स्थानकही उडवण्याचा कट होता.

  दोघेही सैन्यात भरतीसाठी शारीरिक चाचणी उत्तीर्ण
  दोघेही सैन्यात भरतीची तयारी करत होते आणि शारीरिक चाचणीही उत्तीर्ण झाले होते. अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर दोघांनी सोशल मीडियावर अनेक गट तयार केले. यामध्ये त्याने हिंसाचार पसरवण्यासाठी मेसेज व्हायरल केले. त्याने सोशल मीडियावर इतर रेल्वे स्थानके रोखण्यासाठी पोस्टही लिहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

  पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांना गेल्या शुक्रवारी काही सैन्य भरती कोचिंग एजन्सींनी सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर एकत्र येण्यासाठी पेट्रोल बॉम्ब घेऊन जाणाऱ्या तरुणांना संदेश दिला होता. त्या दिवशी आंदोलकांनी अनेक गाड्या पेटवल्या होत्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला.

  तिरुपतीचे पोलीस अधीक्षक परमेश्वर रेड्डी यांनी सोमवारी भारत बंदच्या निमित्ताने जनतेला कोणत्याही प्रकारची आंदोलने, रॅली, धरणे, रास्ता रोको किंवा कोणत्याही प्रकारचे आंदोलन करू दिले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करताना आंदोलक पकडले गेल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ते म्हणाले.