breaking news

१५ ऑगस्टपूर्वी राजधानीत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. यावेळी मिळालेल्या गुप्त खबरीच्या आधारावर पोलिसांनी बांग्लादेशी नागरिकांच्या घरी धडा टाकली. यावेळी करण्यात आलेल्या चौकशीत त्यांच्याकडून १ डझन पासपोर्ट व बांग्लादेशी मंत्रालयाचे १० नकली स्टॅम्प जप्त करण्यात आले. चौकशीत त्यांना याविषयी कोणतेही खास स्पष्टीकरण देता आले नाही.

    नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी रविवारी २ बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून पासपोर्ट व बांग्लादेशी मंत्रालयांचे १० बोगस स्टॅम्प जप्त केलेत. डीसीपी द्वारका एम. हर्षवर्धन यांनी सांगितले की, पालम भागातून पकडण्यात आलेल्या संशयितांचे नाव मोहम्मद मुस्तफा व मोहम्मद हुसैन आहे. या दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे.

    १५ ऑगस्टपूर्वी राजधानीत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. यावेळी मिळालेल्या गुप्त खबरीच्या आधारावर पोलिसांनी बांग्लादेशी नागरिकांच्या घरी धडा टाकली. यावेळी करण्यात आलेल्या चौकशीत त्यांच्याकडून १ डझन पासपोर्ट व बांग्लादेशी मंत्रालयाचे १० नकली स्टॅम्प जप्त करण्यात आले. चौकशीत त्यांना याविषयी कोणतेही खास स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
    पंजाबमध्ये रविवारी पाकच्या ISI पुरस्कृत अतिरेकी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणी कॅनडा स्थित अर्श डल्ला व ऑस्ट्रेलिया स्थित गुरजंत सिंगशी संबंधित मॉड्यूलच्या ४ सदस्यांना अटक करण्यात आली आहे. पंजाबच्या डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींकडून ३ ग्रेनेड, एक आयईडी, दोन 9एमएम पिस्तूल व ४० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.