
दोन्ही भावांच्या मृतदेहांवर कुत्र्याच्या चाव्याच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत. दुसरीकडे कुत्र्यांच्या उपद्रवामुळे सिंधी कॅम्प व परिसरात घबराट पसरली आहे.
गेल्या काही दिवसापासुन देशात एका पाठोपाठ एक कुत्र्यांचा चिमुकल्यांवर हल्ला करण्याच्या घटना घडत आहे. (Dog Attack News) या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असताना आता अशीच एक घटना देशाची राजधानी दिल्लीतुन समोर आली आहे. वसंतकुंज परिसरात आठ ते दहा भटक्या कुत्र्यांनी दोन निष्पाप भावांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. आनंद (७) आणि आदित्य (५) अशी या भावडांची नावं आहेत.
दोन दिवसांत दोन मुलांचा मृत्यू
भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची ही दुसरी घटना १२ मार्चची आहे. 5 वर्षांचा आदित्य झोपडपट्टीबाहेर शौचास गेला असताना परतीच्या वाटेवर कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. तर, पहिली 10 मार्च रोजी दक्षिण दिल्लीतील वसंत कुंज भागातील सिंधी कॅम्पमध्ये घडली होती. भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून 7 वर्षीय आनंदला ठार केले. सिंधी कॅम्पचा संपूर्ण परिसर झोपडपट्टी आहे. गरीब मजूर जंगलाच्या जमिनीवर झोपडपट्टीत राहतात. अवघ्या दोन दिवसांत कुत्रा चावल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे.