file photo-social media
file photo-social media

सकाळी 8 ते 8.30 च्या सुमारास बोरतलाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरतलाव गोंदिया सीमेवर जवानांनी मोबाईल चेक पोस्ट लावली होती. वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यादरम्यान नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला.

राजनांदगाव : छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये पुन्हा एकदा नक्षलवाद्यांची मोठी घटना उघडकीस आली आहे. छत्तीसगड महाराष्ट्र बॉर्डरवर राजनांदगावमध्ये ( Rajnandgaon Naxalite Attack) नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. राजेश हवालदार आणि ललित कॉन्स्टेबल अशी या जवानांची नावे आहेत. 

नेमकं काय घडलं ?

 राजनांदगाव जिल्ह्यातील बोरतलाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे संपूर्ण घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. बोरतलाव पोलिसांच्या हद्दीतील गोंदिया महाराष्ट्र सीमेवर असलेल्या चेक पोस्टवर ड्युटीवर असताना जंगलातून अचानक आलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत.


 

गोळीबार केला, वाहनही पेटवलं

डीएसपी नक्षल ऑपरेशन्स अजित ओंग्रे यांनी सांगितले की, सकाळी 8 ते 8.30 च्या सुमारास बोरतलाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरतलाव गोंदिया सीमेवर जवानांनी मोबाईल चेक पोस्ट लावली होती. वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यादरम्यान नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. गोळीबारात दोन जवान शहीद झाले, मोटारसायकलही नक्षलवाद्यांनी पेटवून दिली. दुसरीकडे, त्याची माहिती मिळताच अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी रवाना करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. सध्या नक्षलवाद्यांची संख्या आणि ही घटना कोणत्या पद्धतीने घडवून आणण्यात आली याची माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात येत आहे.