राजौरीमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; तीन जवान शहीद

राजौरीतील दारहाल भागातील परगलमध्ये लष्कराच्या छावणीचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला. यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला, यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) राजौरीमध्ये भारतीय लष्कराच्या (Indian Army) जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा (Terrorist Killed) केला आहे. ते राजौरीतील लष्कराच्या छावणीत (Army Camp) घुसण्याचा प्रयत्न करत होते. लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत असून, या चकमकीत भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी झाल्याचे समजते.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राजौरीतील दारहाल भागातील परगलमध्ये लष्कराच्या छावणीचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न (Cross The Fence) दहशतवाद्यांनी केला. यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार (Firing) करण्यात आला, यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले.

एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, दारहाल पोलीस स्टेशनपासून ६ किमी अंतरापर्यंत अतिरिक्त पथके पाठवण्यात आली आहेत. यात २ दहशतवादी ठार झाले असून २ लष्करी जवान जखमी झाले. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असून, जखमी जवानांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

J&K | In a
terrorist attack 25 kms from Rajouri, two terrorists carried out a
suicide attack on an Army company operating base. Both terrorists killed
while 3 soldiers lost their lives. Operations in progress.

(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/Qt7TsAawki

ANI (@ANI) August
11, 2022