PoK हा भारताचा अविभाज्य भाग आहे… UAE उपपंतप्रधानांचं वक्तव, नकाशा केला जारी 

पाकिस्तानच्या जवळ असलेल्या संयुक्त अरब अमिरातीने पाकव्याप्त काश्मीर (PoK) हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले आहे. यासाठी यूएईच्या उपपंतप्रधानांनी नकाशा जारी केला आहे.

    पाकव्याप्त काश्मीर (POK) हा भारतासाठी नेहमी चर्चेचा विषय ठरलेला आहे. यावरून भारत पाकिस्तान मध्ये मते मते मंत्तातर आहे. आता काश्मीर प्रश्नाबाबत पाकिस्तानला त्याच्या मित्र देशाचा पाठिंबा मिळत नसल्याचं दिसत आहे. संयुक्त अरब अमिरातीने पाकव्याप्त काश्मीर (POK) हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य केले आहे. त्यासाठी संयुक्त अरब अमिरातीने नकाशा दाखवून पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग म्हणून घोषित केला आहे, हा पाकिस्तानला धक्का आहे.
    टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, UAEचे उपपंतप्रधान सैफ बिन झायेद अल नाहयान यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या शिखर परिषदेचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यूएईच्या उपपंतप्रधानांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काश्मीर भारताचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यात पीओके आणि अक्साई चिनच्या काही भागांचाही समावेश आहे. पीओके हा तो भाग आहे ज्यावर पाकिस्तानने बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे.

    भारत नेहमीच दावा करत आला आहे

    विशेष म्हणजे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा भाग असल्याचा भारत नेहमीच दावा करत असतो. अलीकडेच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की पीओके हा भारताचा भाग आहे आणि राहील. पाकिस्तान सरकार पीओके त्यांचे आहे असे सांगत असते, पण ते खरे नाही कारण त्यांनी ते बेकायदेशीरपणे घेतले आहे.
    अशा परिस्थितीत भारताला UAE सारख्या इस्लामिक देशाकडून पाठिंबा मिळणे ही आनंदाची बाब आहे, तर पाकिस्तानसाठी ही एक प्रकारची धक्कादायक बाब आहे. नुकत्याच झालेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर लाँच करण्यात आला होता. या कराराच्या घोषणेनंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत.या करारात सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश आहे. ज्याचे रशियानेही कौतुक केले आहे.

    UAE ने काश्मीरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे

    यूएईच्या एका रिअल इस्टेट कंपनीने काश्मीरमध्ये अब्जावधींची गुंतवणूक केली आहे. वास्तविक, दुबईस्थित यूएईच्या रिअल इस्टेट डेव्हलपर एमारने श्रीनगरमध्ये मॉल बांधण्याचे कंत्राट जिंकले आहे आणि हा मॉल 10 लाख स्क्वेअर किलोमीटरवर बांधला जात आहे.