नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अंतरिम बजेट सादर केला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रवासी आणि माल वाहतूक रेल्वे गाड्यांची गती वाढली असून यंदाच्या केंद्रीय बजेटमध्येही रेल्वे सुसाट असेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

गेल्या 4 वर्षात आर्थिक विकासाला वेग आला आहे. युवाशक्ती तंत्रज्ञान योजना बनवेल. तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जातील. पॅसेंजर रेल्वे गाड्यांचे कामकाज सुधारले जाईल. मालवाहतूक प्रकल्पही विकसित केला जाणार आहे. प्रत्येकाला कायमस्वरूपी घरे दिली जातील. स्किल इंडियामध्ये 1.47 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पीएम मोदींनी जय अनुसंधानचा नारा दिला आहे. हे लक्षात घेऊन पावले उचलली जातील. 40 हजार सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जातील. विमानतळांची संख्या वाढली आहे. एव्हिएशन कंपन्या एक हजार विमानांची ऑर्डर देऊन पुढे जात आहेत. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा विस्तार केला जाईल. मत्स्य उत्पादनात दुपटीने वाढ झाली आहे.