२१ सप्टेंबरपासून ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होणार, केंद्राने जारी केली नियमावली

शिक्षक, विद्यार्थी आणि शाळे (school) तील कर्मचाऱ्यांना ६ फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील. तसेच वेळोवेळी हात धुणे, चेहऱ्यावर मास्क लावणे, शिंक आल्यास तोंडावर हात ठेवणे, स्वतःच्या प्रकृतीकडे (self health) स्वतःच योग्य लक्ष देणे (self care) आणि थुंकण्या (spitting) सारख्या गोष्टींवर काटेकोरपणे लक्ष ठेवावे लागणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (union health ministry) मंगळवारी ९वी ते १२वीपर्यंत अंशतः शाळा सुरू (starting schools) करण्यासंदर्भात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जारी केली आहे. यामुळे आता २१ सप्टेंबरपासून शाळा (schools) सुरू व्हायला सुरुवात होणार आहे. मात्र, शाळांना शाळांमध्ये शिकविण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे स्वतंत्र्य देण्यात आले आहे. क्लासेस (classes) वेग-वेगळ्या टाईम स्लॉटमध्ये चालतील आणि कोरोना (corona) चे लक्षण (symtoms) असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार नाही.

या नियमांचे पालन सर्वांनाच करावे लागेल (follow the rules and regulations)

शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना ६ फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील. तसेच वेळोवेळी हात धुणे, चेहऱ्यावर मास्क लावणे, शिंक आल्यास तोंडावर हात ठेवणे, स्वतःच्या प्रकृतीकडे स्वतःच योग्य लक्ष देणे आणि थुंकण्यासारख्या गोष्टींवर काटेकोरपणे लक्ष ठेवावे लागणार आहे.

अशी आहे नियमावली (rules for starting schools)

१) शाळेत शिकवायला सुरूवात करण्याबरोबरच ऑनलाईन आणि डिस्टंस लर्निंगही सुरू राहील यावर व्यवस्थापनाला लक्ष द्यावे लागेल.

२) शाळांना ९वी ते १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्वेच्छेने शाळेत येण्याची परवानगी द्यावी लागेल. म्हणजेच शाळेत येणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असणार नाही.

३) विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पालकांची लेखी परवानगी आणावी लागेल. येणारे-जाणारे आणि विद्यार्थी-शिक्षक यांची भेट वेगवेगळ्या वेळेत होईल.

४) केवळ कंटेनमेंट झोन बाहेर असलेल्या शाळाच सुरू करण्याची परवानगी असेल.

५) कंटेनमेंट झोनमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत येण्याची परवानगी नसेल. तसेच शाळेत येणाऱ्या लोकांना कंटेनमेंट झोनमध्ये जाणे टाळावे लागेल.

६) शाळा सुरू करण्यापूर्वी संपूर्ण परिसर, क्लासरूम, लॅब, बाथरूम सॅनिटाईझ करावे लागेल.

७) ज्या शाळांचा वापर, क्वारंटाइन सेंटर म्हणून करण्यात आला होता. त्या व्यवस्थित सॅनिटाईझ कराव्या लागतील.

८) ५०% टिचिंग आणि नॉन टिचिंग स्टाफला ऑनलाईन टिचिंग आणि टेली काउंसिलिंगसाठी शाळेत बोलावले जाऊ शकते.

९) विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक अटेंडन्स ऐवजी कॉन्टॅक्टलेस अटेंडन्सची व्यवस्था करावी लागेल.

१०) सातत्याने विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात ६ फुटांचे अंतर असणे आवश्यक असेल.

११) लाईनसाठी जमिनीवर ६ फुटांच्या अंतरावर मार्किंग करावी लागेल. ही व्यवस्था वर्गांमध्ये आणि बाहेरही असेल.

१२) सुरक्षितता आणि फिजिकल डिस्टन्सिंगचा विचार करता वर्गाबाहेरही शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात चर्चा होऊ शकते.

१३) संभाव्य, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आणि अशा काही इव्हेंट्सना परवानगी नसेल.

१४) विद्यार्थी आपल्या लॉकरचा वापर करू शकतात. मात्र, फिजिकल डिस्टन्सिंग आणि डिसइन्फेक्शनची काळजी घ्यावी लागेल.

१५) जिमचा वापर गाइडलाइन्सच्या आधारे केला जाऊ शकतो. मात्र, स्विमिंगपूल बंदच असतील.

१६) शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना फेस मास्क, हँड सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असेल.

१७) स्वच्छता कर्मचाऱ्यांना थर्मल गन, डिस्पोझल पेपर टॉवेल, साबण, १% सोडिअम हायपोक्लोराईट सॉल्युशन द्यावे लागेल.

१८ ) ॲसिंटोमॅटिकची ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरची व्यवस्था आवश्यक.

१९) झाकता येईल असे डस्टबीन असावे. तसेच कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणेही आवश्यक

२०) सफाईकर्मचाऱ्याला कामापूर्वी योग्य प्रकारे प्रशिक्षित करावे लागेल.