केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वामी रामदेव बाबांच्या पतंजली विद्यापीठाला दिली भेट, आठवलेंकडून रामदेव बाबांच्या कार्याचे कौतुक

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगगुरू स्वामी रामदेव बाबा महाराज यांच्या हरिद्वार येथील पतंजली योग विद्यापीठ येथे स्वामी रामदेव महाराज यांची आज केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आचार्य बालकृष्ण यांचीही रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट घेतली. पतंजली योग विद्यापीठातर्फे स्वामी रामदेव बाबा यांनी रामदास आठवले यांचे हार्दिक स्वागत केले.

    हरिद्वार : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योगगुरू स्वामी रामदेव बाबा महाराज यांच्या हरिद्वार येथील पतंजली योग विद्यापीठ येथे स्वामी रामदेव महाराज यांची आज केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आचार्य बालकृष्ण यांचीही रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट घेतली. पतंजली योग विद्यापीठातर्फे स्वामी रामदेव बाबा यांनी रामदास आठवले यांचे हार्दिक स्वागत केले. स्वामी रामदेव महाराज आणि आचार्य बाळकृष्णजी जोडी आहे म्हणून पतंजलीची गाडी सुरु आहे. असं यावेळी आठवलेंना सांगण्यात आलं.

    दरम्यान, “स्वामी रामदेव महाराज ने जगा दी है गाव गाव की गली गली… इसलीये पोहोच गयी है गाव गाव पतंजली” तसेच “मुझे अच्छे लगते है बाबा रामदेव महाराज, इसलीये आया हू पतंजली आज… बाबा रामदेव के सिर पर चढाओ शक्तिशाली ताज”. अशी उत्स्फूर्त कविता सादर करून मंत्री रामदास आठवले यांनी पतंजली योग विद्यापीठ हर्ष उल्हासाने उत्साहित केले. यावेळी रामदास आठवले यांच्या पत्नी सौ. सीमाताई आठवले, पुत्र जित आठवले आणि कुटुंबीय उपस्थित होते.