बंगालची लढाई पुन्हा, ममता विरुद्ध ‘बाहरी’,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय आणि नियुक्ती या दोन्ही गोष्टी आश्चर्यकारक आहेत. जी नावे कुणाच्याही विचारात नसतात, त्यांना राष्ट्रपतीपासून राज्यपाल किंवा इतर महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करतात.

    नवी दिल्ली – पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून डॉ. सीव्ही आनंद बोस हे २३ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे शपथ घेणार आहेत. डॉ. सीव्ही आनंद बोस यांची राष्ट्रपती भवनाने पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी ७१ वर्षीय डॉ. आनंद बोस हे मेघालय सरकारचे सल्लागार होते. मात्र, बंगालचे नवे राज्यपालपदी सीव्ही आनंद बोस यांची नियुक्ती झाल्यानंतर तृणमूलमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय आणि नियुक्ती या दोन्ही गोष्टी आश्चर्यकारक आहेत. जी नावे कुणाच्याही विचारात नसतात, त्यांना राष्ट्रपतीपासून राज्यपाल किंवा इतर महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करतात. राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा होईपर्यंत उपराष्ट्रपतीसाठी द्रौपदी मुर्मू किंवा बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांच्याविषयी कुठेही चर्चा झाली नव्हती. असाच काहीसा प्रकार आता बंगालच्या नव्या राज्यपालांच्या नियुक्तीमध्ये दिसून आला आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल कोण होणार याचा राज्यातील भाजपच्या नेत्यांनाही याबाबत सुगावा लागला नव्हता.