लष्करातील महिला अधिकाऱ्यांना समर्पित टपाल तिकीटाचं अनावरण

आर्मी डे 15 जानेवारीला साजरा करण्याची दोन मुख्य कारणं आहेत. 1 एप्रिल 1895 ला भारतीय सैन्याची अधिकृतपणे स्थापना झाली. मात्र, 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय सैन्याची ब्रिटिशांपासून मुक्तता झाली होती. तर दुसरं कारण म्हणजे याच दिवशी जनरल केएम करियप्पा यांना भारतीय लष्कराचा कमांडर इन चीफ म्हणून घोषित करण्यात आलं होतं.

    भारतीय लष्कराच्या 74 व्या दिवसाचं औचित्य साधून आज “भारतीय लष्करातील महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी कमिशन” अशा आशयाच्या तिकिटाचं अनावरण करण्यात आलं. लष्कर प्रमुख जनरल एमएम नरवणे यांच्या हस्ते या तिकाटांच अनावरण झालं.

    शनिवारी साजरा करण्यात आलेल्या ७४ व्या लष्कर दिनानिमित्त आपल्या भाषणादरम्यान, लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे म्हणाले की, सीमारेषेवरील स्थिती एकतर्फी बदलण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना लष्कर प्रतिबंधित करेल आणि देशाचा संयम आत्मविश्वासातून निर्माण होतो. मात्र संयमाची परिक्षा पाहू नये. शत्रूंना योग्य तो धडा शिकवला जाईल.

    आर्मी डे 15 जानेवारीला साजरा करण्याची दोन मुख्य कारणं आहेत. 1 एप्रिल 1895 ला भारतीय सैन्याची अधिकृतपणे स्थापना झाली. मात्र, 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय सैन्याची ब्रिटिशांपासून मुक्तता झाली होती. तर दुसरं कारण म्हणजे याच दिवशी जनरल केएम करियप्पा यांना भारतीय लष्कराचा कमांडर इन चीफ म्हणून घोषित करण्यात आलं होतं. वास्तविक फील्ड मार्शल केएम करिअप्पा हे 15 जानेवारी 1949 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करप्रमुख झाले. भारताच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची घटना आहे. म्हणूनच दरवर्षी 15 जानेवारी हा भारतीय सेना दिन म्हणून साजरा केला जातो.