यूपीचे डीजीपी मुकुल गोयल यांना सरकारने पदावरून हटवले, सरकारच्या कामात निष्काळजीपणाचा आरोप

सरकारी कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांना सिव्हिल डिफेन्सचे डीजी बनवण्यात आले आहे. १ जुलै २०२१ रोजी मुकुल गोयल यांना यूपीचे डीजीपी बनवण्यात आले.

    नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक डीजीपी मुकुल गोयल यांना योगी सरकारने हटवले आहे. सरकारी कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांना सिव्हिल डिफेन्सचे डीजी बनवण्यात आले आहे. १ जुलै २०२१ रोजी मुकुल गोयल यांना यूपीचे डीजीपी बनवण्यात आले. ते १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुकुल गोयल हे मूळचा शामली, मुझफ्फरनगरचा आहे.