यूपीआयने पेमेंट करताय? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची; RBI ने घेतलाय मोठा निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण नुकतेच जाहीर केले. यावेळी रेपो दर आणि इतर धोरण दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच यूपीआय पेमेंट करण्याची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली.

    मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण नुकतेच जाहीर केले. यावेळी रेपो दर आणि इतर धोरण दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच यूपीआय पेमेंट करण्याची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे युजर आता 1 लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे यूपीआयद्वारे पाठवू शकतो. चलनविषयक धोरण आढावा बैठकीनंतरच्या पत्रपरिषदेत ही माहिती देण्यात आली.

    यूपीआयची लिमिट फक्त हेल्थ केअर आणि शिक्षणासाठी करण्यात येणाऱ्या यूपीआय पेमेंटसाठी वाढविण्यात आली आहे. अन्य यूपीआय पेमेंटसाठी 1 लाखांपर्यंतच लिमीट ठेवण्यात आली आहे.

    आरबीआयने म्युच्युअल फंड सबस्क्रिप्शन, इन्शुरन्स प्रीमियम सबस्क्रिप्शन आणि क्रेडिट कार्ड रिपेमेंटसाठी ऑनलाईन पेमेंटची मर्यादा 15 हजार रुपये प्रति पेमेंटवरुन 1 लाख रुपये करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे नागरिक यूपीआयचा अधिक वापर करतील, असे आरबीआयचे म्हणणे आहे.