युपीएससीकडून सिव्हिल सर्व्हिसेस परिक्षेचा निकाल जाहीर, शुभम कुमारने पटकावला पहिला क्रमांक

युपीएससीने (UPSC Result) आपल्या २०२०मधील सिव्हिल सर्व्हिसेसच्या परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

    युपीएससीने (UPSC Result) आपल्या २०२०मधील सिव्हिल सर्व्हिसेसच्या परिक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत ७६१ उमेदवार (761 Candidates Of UPSC Recommended For Appointment) पास होऊन नियुक्तीसाठी पात्र ठरले आहेत. शुभम कुमार या परीक्षेत देशात पहिला आला आहे. जागृती अवस्थी मुलींमध्ये पहिली आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार या उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील मृणाली जोशी हीने ३६ वा तर विनायक कारभारीला ३७ वा रँक मिळाला आहे.

    निकालानुसार, टॉप २५ उमेदवारांमध्ये १३ मुले आणि १२ मुलींचा समावेश आहे. शिफारस केलेल्या उमेदवारांमध्ये २५ व्यक्ती अपंगत्व असलेल्या (०७ ऑर्थोपेडिकली अपंग, ०४ दृष्टिहीन आव्हान, १०श्रवणदोष आणि ०४ अनेक अपंग) यांचा समावेश आहे.