दोन दिवसांत योगींना दुसरा धक्का, स्वामी प्रसाद मौर्य यांच्या पाठोपाठ मंत्री दारासिंग यांचाही राजीनामा, आणखी काही मंत्र्यांचे राजीनामे पडण्याची शक्यता

दुसरीकडे सपाही मुख्तार अन्सारी यांच्या गुन्हेगारी प्रतिमेपासून दूर राहण्यासाठी दारासिंह यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. त्यांचा सध्याचा मतदारसंघ असलेला मधुबनही, ते सपासोबत गेल्याने अधिक मजबूत झाला आहे. मात्र जातीची समीकरणे लक्षात घेतली तर दारासिंह यांच्यासाठी घोसी मतदारसंघच जास्त सुरक्षित मानण्यात येतो आहे.

  लखनऊ : उ. प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपातील बडे नेते पक्ष सोडताना दिसत आहेत. मंगळवारी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि ३ आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर, बुधवारी वनमंत्री दारासिंह चौहान यांनीही भाजपाला रामा राम केला आहे. विचापूर्वक केलेल्या रणनीतीनुसार दारासिंह यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. मख्तार यांच्या घोसी मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्याची तयारी करीत आहेत. या मतदारसंघात समाजवादी पार्टीच्या तिकिटावर दारासिंह यांनी निवडणूक लढवली तर त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. म्हणूनच त्यांनी मंत्रिपद आणि भाजपाला तूर्तास रामराम केला आहे.

  दुसरीकडे सपाही मुख्तार अन्सारी यांच्या गुन्हेगारी प्रतिमेपासून दूर राहण्यासाठी दारासिंह यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. त्यांचा सध्याचा मतदारसंघ असलेला मधुबनही, ते सपासोबत गेल्याने अधिक मजबूत झाला आहे. मात्र जातीची समीकरणे लक्षात घेतली तर दारासिंह यांच्यासाठी घोसी मतदारसंघच जास्त सुरक्षित मानण्यात येतो आहे.

  दारासिंह यांनी वेगळे कारण सांगितले मात्र..

  दारासिंह यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या पत्रात सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. आपण आपल्या जबीबदारीला पूर्ण न्याय दिला हे सांगतानाच, राज्य सरकार शेतकरी, गरीब आणि वंचित, बेरोजगारांची उपेक्षा करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वंचितांना आणि दलितांना आऱक्षण देण्यावरुन जो खेळ मांडला आहे, त्यामुळे व्यथित झाल्याचेही त्यांनी यात लिहिले आहे.

  दुसरीकडे अखिलेश यादव यांनी दारासिंह हे सापत येतील, अशी शक्यता वर्तवली आहे. उ. प्रदेशातील जनता घृणा आणि नकारात्मक राजकारणाला कंटाळली असल्याचे अखिलेश यांचे म्हणणे आहे. स्वामी यांच्यानंतर आता अजून काही जण पक्षात येत आहेत. आपली लढाई अधिक सोपी होत असल्याचे अखिलेश यांनी सांगितले.

  २०१७ साली दारासिंह हे मधुबनमधून भाजपाच्या तिकिटावर लढले होते. मधुबनमध्ये त्यांनी त्यांच्या ताकदीवर भाजपाला विजय मिळवून दिला होता. या जागेवर भाजपाला पहिल्यांदा यश मिळाले होते. सपासोबत इथे राजभर आल्याने, इथली मतांची समीकरणे बदलली होती, त्यामुळे त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. दारासिंह हे चोहान समाजाचे नेते सून, मऊसह २० जिल्ह्यांत त्यांचा प्रभाव असल्याचे मानण्यात येते आहे.