प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

उ. प्रदेशात निकालाची नवी लाट दिसत असल्याचे, यावेळी माध्यमांशी बोलताना अमित शाह म्हणाले. ज्या कैरानातून काही वर्षांपूर्वी नागरिक पलायन करत होते, आता तिथे भयमुक्त वातावरणात जनता राहत असल्याचे त्यांनी सांगितले. आता स्थानिकांमध्ये आत्मविश्वास परतला आहे.

  कैराना : अमित शाह (Amit Shah) यांनी शनिवारी कैरानात जाऊन प्रचार केला. ज्या परिसरातून हिंदू काही वर्षांपूर्वी पलायन करत होते, त्या भागात घराघरात अमित शाह फिरले. आता तुम्हाला कुणाचा त्रास होतो का, अशी विचारपूसही त्यांनी स्थानिकांना केली. छोट्या गल्लीबोळांतून फिरत त्यांनी पत्रके वाटली. यावेळी शाहा यांच्यासोबत अनेक मुस्लीम कार्यकर्तेही होते, अनेक कार्यकर्त्यांना शाह यांच्यासोबत सेल्फीचा मोह होत होता.

  आधी पलायन होत होते, आता आत्मविश्वास परतलाय-शाह

  उ. प्रदेशात निकालाची नवी लाट दिसत असल्याचे, यावेळी माध्यमांशी बोलताना अमित शाह म्हणाले. ज्या कैरानातून काही वर्षांपूर्वी नागरिक पलायन करत होते, आता तिथे भयमुक्त वातावरणात जनता राहत असल्याचे त्यांनी सांगितले. आता स्थानिकांमध्ये आत्मविश्वास परतला आहे. केवळ एका वर्गासाठी काम करण्याची सरकारी प्रथा बंद करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले.

  पलायनाचा मुद्दा उठवणाऱ्या खासदाराची मुलगी निवडणूक रिंगणात

  कैरानातील भाजपा उमेदवार मृगांका सिंह याही अमित शाह यांच्यासोबत होत्या. मृगांका या खासदार हुकुम सिंह यांच्या कन्या आहेत. हुकुम सिंह यांनी पहिल्यांदा या भागातील हिंदू पलायनाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर हा विषय चर्चेत आला होता. कैरानाकडे भाजपाचे विशेष लक्ष आहे. महिनाभरापूर्वी योगी आदित्यनाथ यांनीही इथला दौरा केला होता. त्यावेळी योगींनी पलायनानंतर परतलेल्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.

  काय आहे कैराना पलायन प्रकरण

  मे २०१६ मध्ये कैरानातून हिंदूंचे पलायन होत असल्याचा आरोप केला होता. या परिसरातील मुस्लीम दबंग नेत्यांच्या भीतीने हिंदू परिवार कैराना सोडत असल्याचे त्यांनी सांगितले होते. यावर मोठे राजकारणही झाले होते.

  दरम्यान अमित शाह यांच्या उ. प्रदेशातील प्रचारावर काँग्रेसने टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे प्रचारासाठी आले असताना त्यांना लखनौ विमानतळावर रोखण्यात आले होते. आता गृहमंत्री पाच लोकांसह डोअर टू डोअर प्रचार करीत आहेत का, असा प्रश्न बघेल यांनी विचारला आहे. अमित शाह यांनी डोअर टू डोअर अभियानाचे ब्रँड अम्बेसेड जाहीर करायला हवे आणि त्यांनी याचा एक व्हिडिओ डेमो करुन द्यायला हवा, अशी टीकाही त्यांनी केली आहे. अन्यथा निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल, या प्रकरणी एफआयआर फक्त काँग्रेस मुख्यमंत्र्यांवरच का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.