नोएडाच्या रेस्टॉरंटमध्ये तोडफोड, तरुणांना स्टंट करण्यापासून रोखले, त्यांनी खुर्च्या फेकत केली मारहाण

ही घटना 19 जानेवारी रोजी रात्री घडली. पोलीस स्टेशन-39 अंतर्गत ही घटना घडली. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. भाऊ आणि बहिणीने पोलिसांत तक्रार केली आहे.

    नवी दिल्ली – नोएडाच्या सेक्टर-46 मधील ग्लोरी मार्केटमध्ये फिट फूडी रेस्टॉरंट चालवणाऱ्या बहिण-भावाला काही मुलांनी बेदम मारहाण केली. त्यांच्या रेस्टॉरंटसमोर काही मुले स्टंट करत होते. त्यावर त्यांनी स्टंटबाजी येथे करू नका म्हणून त्यांना रोखले. त्यामुळे त्या तरुणांना राग आला. त्यांनी दोघांवर लाठीने मारहाण केली. तर रेस्टॉरंटची तोडफोड केली. या प्रकरणात पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहे.

    घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही आला समोर
    ही घटना 19 जानेवारी रोजी रात्री घडली. पोलीस स्टेशन-39 अंतर्गत ही घटना घडली. या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. भाऊ आणि बहिणीने पोलिसांत तक्रार केली आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, तरुण रेस्टॉरंटच्या बाहेर ठेवलेल्या खुर्च्या उचलून आतमध्ये फेकून देत आहेत. त्यामुळे रेस्टॉरंटच्या काचाही फुटल्या आहेत.

    सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु
    संतप्त झालेल्या तरूणांनी हातात लाठीकाठी घेऊन त्या बहीण भावाच्या दुकानावर मारहाण करण्यास सुरुवात केली. रेस्टॉरंटबाहेर असलेल्या खुर्च्या फेकून मारल्या. हॉटेलच्या काचा फुटल्या गेल्या. बहीण आपल्या भावाला आवरते. त्यांना बाहेर जाऊ देत नाही. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध केला जात आहे.