maharashtra tableau

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात (Republic Day Parade) उत्तर प्रदेशचा (Uttar Pradesh Tableau) चित्ररथ सर्वोत्‍कृष्‍ट ठरला आहे. तर लोकप्रिय निवड गटात (Popular Choice Category) महाराष्‍ट्राच्‍या चित्ररथाने बाजी ( Maharashtra Tableau ) मारली आहे.

    नवी दिल्ली : दिल्लीमध्ये राजपथावरील (Republic Day Parade)  प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात उत्तर प्रदेशचा (Uttar Pradesh Tableau) चित्ररथ सर्वोत्‍कृष्‍ट ठरला आहे. सलग दुसऱ्या वर्षी उत्तर प्रदेशने सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा मान मिळवला आहे. तर लोकप्रिय निवड गटात (Popular Choice Category) महाराष्‍ट्राच्‍या चित्ररथाने बाजी (Maharashtra Tableau ) मारली आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट मार्चिंग पथक म्हणून सीआयएसएफची निवड करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली.

    संरक्षण सेवेत भारतीय नौदलाचे पथक सर्वोत्कृष्ट ठरले. तसेच भारतीय हवाई दलाने पॉप्युलर चॉईस प्रकारात बाजी मारली आहे. शिक्षण मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय यांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आले आहे.

    दिल्लीत राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. महाराष्ट्रातील जैवविविधता या विषयावर यंदाच्या चित्ररथ साकारण्यात आला होता. महाराष्ट्राच्या चित्ररथावरील सजावट आणि कलाकुसर ही नेहमीच कौतुकाचा विषय ठरते. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसमोरुन महाराष्ट्राचा चित्ररथ जात असताना सर्वचजण स्तब्ध होऊन पाहत होते. त्यामुळे महाराष्ट्राचा चित्ररथ आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरला.

    महाराष्ट्राच्या चित्ररथांनी २०१५ नंतर दोन वेळा राजपथावरील संचलनात बाजी मारली आहे. २०१५ मध्ये ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. तर २०१८ ला ‘शिवराज्याभिषेक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. या दोन्ही चित्ररथांनी प्रथम क्रमांक पटकावला होता.