अंकिताच्या कुटुंबीयांना 25 लाखांची भरपाई देण्याची उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची घोषणा!

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी करण्यासाठी आम्ही न्यायालयाला फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची विनंती केली आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून आम्ही दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे

    उत्तराखंड : अंकिता भंडारी हत्या प्रकरणी नागरिकांचा संताप अजून कमी झालेला नाही. या घटनेनं जनमानसात रोष असून आरोंपीन फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.  उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांनी या प्रकरणी मोठी घोषणा केली आहे. अंकिता भंडारीच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची भरपाई  देण्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

    मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, या प्रकरणावर लवकरात लवकर सुनावणी करण्यासाठी आम्ही न्यायालयाला फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची विनंती केली आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून आम्ही दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणी एसआयटी मार्फत सर्व बाबींचा तपास करण्यात येत असून, पथकाने हळूहळू पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर करुन प्रकणाचा निकाल योग्यरित्या लागणार असंही ते म्हणाले.