उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावतप्रकृती खालावल्याने दिल्लीतील ‘एम्स’मध्ये दाखल ; कोरोनाची झाली आहे लागण

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांची प्रकृती खालवली असून त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नेण्यात येत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. काही दिवस अगोदर मुख्यमंत्री रावत यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आलं होतं.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांची प्रकृती खालवली असून त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नेण्यात येत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. काही दिवस अगोदर मुख्यमंत्री रावत यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आलं होतं. जीटीसी हॅलीपॅडवरून त्यांना दिल्लीकडे रवाना करण्यात आलं आहे. प्रकृती खराब झाल्याने रविवारी सायंकाळी त्यांना डेहराडून येथील दून वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी रावत यांच्या फुफुसांचे सीटी स्कॅन केले गेले होते, ज्यामध्ये थोडेफार इंफेक्शन झाल्याचं दिसून आलं होतं.

 

१८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री रावत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून ते होम क्वारंटाईनमध्ये होते. विधानसभा सत्रात देखील ते वर्चुअली सहभागी झाले होते. तसेच, इतर कार्यक्रमांना देखील त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती.तर, मुख्यमंत्र्यांचे फिजीशियन डॉ. एन एस बिष्ट यांनी सांगितले आहे की, रावत यांच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा आहे. मात्र दिल्लीत केवळ वैद्यकीय सल्ला म्हणून पाठवले गेले आहे. त्या ठिकाणी त्यांच्या काही तपासण्या केल्या जातील.