उत्तर प्रदेशात AIMIMही निवडणूक रिंगणात : पक्षाचे प्रमुख ओवेसी म्हणाले- १०० जागांवर उमेदवार उभे करणार, ओमप्रकाश राजभर यांच्याशी युती करणार

पक्षाने उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली असून आम्ही उमेदवारांचा अर्जही जाहीर केला आहे. आम्ही ओम प्रकाश राजभर साहब यांच्या 'भागीदारी संकल्प मोर्चा' सोबत आहोत, आम्ही निवडणुका किंवा युतीसंदर्भात इतर कोणत्याही पक्षाशी बोललेलो नाही.

  उत्तरप्रदेश : अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) ने बसपाशी झालेल्या युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांचा पक्ष पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये ओम प्रकाश राजभर यांच्या भारतीय सुहेलदेव समाज पक्षासमवेत विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

  निवडणुकीत एआयएमआयएमचे १०० उमेदवार उभे केले जातील, असेही त्यांनी सांगितले. त्यांची यादीही तयार केली जात आहे. ओवेसी यांनी लिहिले की, “पक्षाने उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली असून आम्ही उमेदवारांचा अर्जही जाहीर केला आहे. आम्ही ओम प्रकाश राजभर साहब यांच्या ‘भागीदारी संकल्प मोर्चा’ सोबत आहोत, आम्ही निवडणुका किंवा युतीसंदर्भात इतर कोणत्याही पक्षाशी बोललेलो नाही.

  मायावतींनी सकाळीच आपण स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले

  बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) सुप्रीमो मायावती यांनी रविवारी सकाळीच उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड येथे स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. तथापि, पंजाबमध्ये युतीची व्याप्ती कायम राहील. उत्तर प्रदेशात बसपा आणि असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एआयएमआयएम यांच्यात युती होऊ शकते अशा बातम्याही बसपाच्या सुप्रीमो मायावती यांनी फेटाळून लावल्या.

  मायावतींनी सतीशचंद्र मिश्रा यांची मीडिया सेलचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्ती केली

  सोशल मीडियावर असे लिहिले की कालपासून माध्यमांमध्ये अशी बातमी प्रसारित होत आहे की ओवैसी यांचा पक्ष एआयएमआयएम आणि बसपा एकत्रितपणे युपीमधील आगामी विधानसभा निवडणुका लढवतील. ही बातमी पूर्णपणे खोटी, दिशाभूल करणारी आणि तथ्यहीन आहे. यासह त्यांनी सतीशचंद्र मिश्रा यांना बसपा मीडिया सेलचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्तीबाबतही माहिती दिली आहे.

  Utter Pradesh Assembly Election 2022 aimim chief owaisi said will contest elections in up with rajbhar aimim candidate will land on 100 seats